Ticker

6/recent/ticker-posts

अनिल बोंडे यांचं पुन्हा वादग्रस्त विधान, पप्पू टप्पू उडान टप्पू म्हणत राहुल गांधींना हिनवलं


अमरावती : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ छाटायला नको तर जिभेला चटके द्यायला पाहिजे असं वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना लक्ष केले आहे. 'पप्पू टप्पू उडान टप्पू' म्हणत बोंडे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यामुळे भाजप-काँग्रेस असा संघर्ष पुन्हा अमरावतीत पेटण्याची चिन्ह आहेत.

खासदार डॉ.अनिल बोंडे पत्नी डॉ. वसुधा बोंडे यांच्यासोबत अंदमान निकोबार बेटाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारच्या हिंदी राजभाषा समितीच्या निमित्याने त्यांचा हा दौर होतं आहे. दरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सेल्युलर तुरुंगातील काळकोठरीला भेट दिली. ज्या ठिकाणी सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागली त्या कोठडीत जाऊन अनिल बोंडे यांनी सावरकरांचे स्मरण केलं.  त्या कोठडीत काही काळ ध्यानही केलं. तसेच सावरकरांच्या पावन स्मृतीला आपण नमन करत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. असं असतानाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफी वीर म्हणून हिनवणाऱ्या राहुल गांधी यांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला. दहा वर्षापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या कोठडीत वास्तव्य केलं. जी माणसं वीर सावरकरांवर टीका करतात, त्यांनी या कोठडीत एकदा येऊन बघावं. सात दिवस राहून पहावं. इथला कोल्हू चालवावा. तुरुंगातले कपडे घालावी त्यावेळी काँग्रेस आणि समस्त टीकाकारांना सावरकरांचे देशासाठी काय बलिदान होतं, त्यांनी देशासाठी काय त्याग केला, हे लक्षात आल्याशिवाय राहणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केल.

Post a Comment

0 Comments