Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हयातून विश्वनाथ आनंद सारखे तयार व्हावे - डॉ. एच.पी. तुम्मोडबुलढाण्यात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्‌घाटन 

बुलढाणा, खेळात विजय व पराजय होत असतो. मात्र या पराजयातून आपणालया यशाचा मार्ग मिळतो. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.  या खेळातून  आपणाला अपयश पचवण्याची क्षमता मिळते.  या ठिकाणी जिल्हयातील अनेक प्रतिभावान खेळाडू उपस्थित झाले आहेत. यांची प्रतिभा पाहता जिल्हयातून विश्वनाथ आनंद सारखे खेळाडू तयार व्हावे अशी अपेक्षा करतो. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डाॅ. एच.पी. तुम्मोड यांनी केले. ते  बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे आयोजित राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते. सदर उदघाटन शुक्रवार 14 एप्रील रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन  बुलढाणा बुध्दीबळ सर्कल, ऑल इंडिया बुध्दीबळ फेडरेशन आणि महाराष्ट्र बुध्दीबळ असोसिएशनच्या वतीने  करण्यात आले होते. या स्पर्धेत  17 वयोगटाच्या आतील खेडाळूंचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेचे उद्‌घाटन आंतर राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू डॉ तेजस्वी सागर, बुलढाणा अर्बनचे सीएमडी डाॅ. सुकेश झंवर, जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे 180 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या बुद्धिबळ स्पर्धाकरिता 78 टेबले लावण्यात आले असून तीन दिवसात 8 राउंड चालणार आहे.या बुद्धिबळ स्पर्धेत सर्व  खेळाडूंना रेटिंग दिल्या जाणार आहेतआणि निवडल्या जाणारे 7 खेडाळू राष्ट्रीय स्तरावर बुद्धीबळ स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे.   यावेळी बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे, औरंगाबादचे अकॅडमी चालक हेमंत पाटील,  हेमंत गायकवाड धनंजय देशपांडे, अंकुश रक्ताडे आदी मान्यवर उपस्थित होते.  

 देशाचे नाव मोठे करावे.. डॉ. सुकेश झंवर 

या स्पर्धेसाठी या ठिकाणी खेळाडू सोबत त्‍यांचे पालक देखील आले आहे. मुलांनी या गोष्टीचे भान ठेवावे की त्‍यांचे पालक त्‍यांच्यासाठी खुप परिश्रम घेत आहे. खेळाडूंनी देखील परिश्रम घ्यावे. आज त्‍यांच्यासाठी खुप सुविधा आहेत पूर्वी एवढया सुविधा उपलब्ध न व्हत्‍या या सु विधेचा लाभ घेवून खेळाडूंनी आपले, आपल्या गावाचे, शहराचे देशाचे  नाव मोठे करावे.

Post a Comment

0 Comments