डॉक्टर हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्र समोरील छायाचित्र
आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांचा पुढाकार, होतकरू मुलाला घेतले शिक्षणासाठी आयुक्ताने दत्तक
रोजमजुरी करणाऱ्या या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरंतर हल्लीच्या काळामध्ये शिक्षण घेणे इतक सोपे राहिले नाही, तर शिक्षणासाठी लागणारा अवाढव्य खर्च हा ग्रामीण विभागातील पालकांच्या झेपावत नाही. उच्चशिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करणे आता कठीण झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. असे असतानाच अभ्यासाची जिद्द व होतकरू असणारे विद्यार्थी आजही विविध परीक्षांमध्ये आगेकूच करीत आहेत. इयत्ता दहावीच्या ढानकी या ठिकाणी शिक्षण घेत होता.तो शाळेत टॉपर राहिल्या आहेत. 97.00 गुण घेऊन आपली जिद्द सिद्ध केली. परंतु घरची परिस्थिती गरीब असल्याने पुढील शिक्षणासाठी काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावेळी त्यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधून, सर आम्हाला पुढील शिक्षण घ्यायचं आहे! विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षणामध्ये आमची रुची आहे. असा संवाद भ्रमणध्वनीवरून साधला असता सहृदय व समाजमन असलेल्या या अधिकाऱ्याने चक्क मुंबईवरून या त्यास मायेचा आधार देत पुढील शिक्षणासाठी दत्तक घेतले. विशेष म्हणजे नांदेड या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्याकरिता लागणारा खर्च सुद्धा उचलला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पारधी, कोलाम व इतर मागासवर्गीय समाजामधील असणाऱ्या गरजू व गरीब मुलांना डॉ. कांबळे यांनी दत्तक घेऊन शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणले आहे. राज्यांमध्ये असणाऱ्या सर्व ठिकाणच्या गरजू व गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याचे उद्दिष्ट सुद्धा त्यांनी ठेवले आहे विशेष म्हणजे बुलढाणा या ठिकाणी वस्तीग्रह मध्ये शिकणाऱ्या एका मुलाला उच्च शिक्षणासाठी मुंबईला तब्बल 15 वर्षे मदत केली तो इंगोले नामक विद्यार्थी आज अभियांत्रिकी बुलढाणा येथील महाविद्यालयांमध्ये नोकरीवर आहे तसेच इतर बेडयावरील मुले नोकरीवर लागली आहेत. हा दत्तक घेण्याचा उपक्रम दरवर्षी डॉ. हर्षदीप कांबळे सर आवर्जून राबवितात समाजासाठी सातत्याने झटणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने आज अनेक विद्यार्थी आपल्या पायावरती उभे केले आहेत.तर अनेक युवक विद्यार्थी उद्योगासाठी सुद्धा समोर आले आहेत. राज्याच्या बदलत्या उद्योग धोरणांमध्ये आयुक्त डॉ. कांबळे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
मायेचा आधार मिळाला
आम्हाला पुढील शिक्षण घेण्याकरिता केलेली मदत बहुमोलाचे आहे. डॉ. हर्षदीप कांबळे सरांनी एका हाकेवर मायेची हाक दिली. त्यामुळे आम्ही पुढील वैद्यकीय घेउन समाजासाठी कार्य करीत राहू ,असे बुद्ध भूषण म्हणतो.
होतकरू मुले ही आमची संपत्ती आहे!
समाजातील गरीब होतकरू मुलांना मदत करणे ही आम्ही पप्राथमिकता दिली आहे आम्ही दोघांनीही अपत्य न होऊ देण्याचा संकल्प केला आहे विशेष म्हणजे समाजातील ही सर्व मुले आमची मुले आहे आणि भविष्यातील ही मोठी संपत्ती आहे त्या करिताच आम्ही या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिल आहे अशी प्रतिक्रिया उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोचाना हर्षदीप कांबळे यांनी दिली.
सामाजिक कार्य कौतुकास्पद
बंदी भागामध्ये असणाऱ्या बुद्धभूषण डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांनी केलेली मदत अत्यंत मोलाची आहे ही मदत सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाची असून येणाऱ्या भविष्यातील समाजमन घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे गरजू विद्यार्थ्यांना मदत होणे हे त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी बदल होण्यासारखे आहे. प्रज्ञानंद खडसे, सभापती पंचायत समिती उमरखेड
जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले



0 Comments