Ticker

6/recent/ticker-posts

शाळा सुरू करण्याबाबत, आरोग्यमंत्र्याचा गंभीर इशारा..

From Facebook


जालना | देशात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी, धोका मात्र अजूनही कायम आहे. अशातच कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे, पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. 


त्यातच आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतांना दिसून येत आहे.  अशातच ज्या भागात कोरोना नियंत्रणात आला आहे, अशा भागात शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. 


याबाबत आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, गंभीर इशारा दिला आहे. लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण हे अजूनही झालेले नाही. लहान मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका हा जास्त आहे. 


त्यामुळे सध्या शाळा सुरू करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांचे लसीकरण होत असल्याने, महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.


राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या विभागातील शाळा पहिल्या टप्यात सुरु करण्याचा निर्णय, महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मागील महिनाभरापासून एकही रुग्ण न आढळलेल्या ठिकाणी 15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जात आहेत. 


वर्ग सुरू करण्यापुर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहेत. पण लहान मुलांचे लसीकरण झाले नसल्याने, आता लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.


त्याचबरोबर कोरोनामुळे आधीच नागरिक पेचात आहे, अशा परिस्थितीत कोरोना परिस्थिती गंभीर असलेल्या जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करावेत, पण कोरोना स्थिती नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यात निर्बंध पुर्णपणे काढून टाकावेत, असं आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments