नवी दिल्ली | आपल्या मार्गातील काटा कायमचा दूर व्हेवा, यासाठी एका पतीने चक्क पत्नीच्या खुनाचा कट रचला. यातील धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेत राहत असलेल्या पतीने भारतात असणा-या पत्नीची हत्या केली आहे. या हत्येमागील ख-या कारणाने सर्वांना धक्का बसला आहे.
तामिळनाडूमधील तिरुवरुर येथे ही निर्घुण घटना आहे. जयाभारती असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. पाच वर्षांपुर्वी आरोपी विष्णुसोबत जयाभारती हिचे लग्न झाले होते. दोघेही पती पत्नी आनंदाने अमेरिकेमध्ये राहत होते. मात्र काही दिवसांनी, दोघांमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या कारणांनी वाद होऊ लागले.
सततच्या वादाला कंटाळून जयाभारतीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. भारतात येऊन तिने तिच्या पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. घटस्फोटानंतर आपल्याला पत्नील पोटगी द्यावी लागेल या भितीने ही हत्या केल्याचे वर्तविल्या जात आहे.
जयाभारती या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरुन कामाला निघाल्या होत्या. दुचाकीवरुन कामाला जात असतांना एका भरधाव येणा-या ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. ट्रक ड्रायव्हर ने तेथून लगेचच पळ काढला.
रस्त्यावरील लोकांना अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जयाभारती यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. जयाभारती यांच्या कुटुंबियांना ही हत्या असल्याचा संशय आल्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यानिशी ट्रक चालकाचा पत्ता लावला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, पती विष्णु याने ट्रक ड्रायव्हरला सुपारी दिली असल्याचं पुढे आलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.


0 Comments