Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनामुळे 9 वर्षाच्या चिमुकलीवर काळाची झडप

From Pixabay


कोल्हापूर | कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. परंतू धोका हा अजूनही कायम आहे. कोरोनाच्या वाढत्या नव्या प्रकारामुळे कमी होत जाणारी रूग्णसंख्या अचानक वाढू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. 


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात धोका असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.  अशातच घडलेल्या एका घटनेने एका कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


ही दुःखद घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. कोरोनामुळे एका 09 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनासह पालकांची चिंता वाढली आहे.


काही दिवसांपूर्वी, कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील नुल या गावातील 9 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 


परंतु, कोरोना वरील उपचार सुरू असतांनाच या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यात एवढ्या लहान वयाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची, ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.


या पार्श्वभूमीवर आता लवकरात लवकर लहान मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याची गरज असल्याचे मत पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments