Ticker

6/recent/ticker-posts

घराचा कणा असलेल्या महिलांचे आरोग्य सुस्थितीत असावे हेच माझ ध्येय - माधुरी देवानंद पवार



सप्तशृंगी महिला अर्बनचा उत्स्फूर्त उपक्रम, पंचक्रोशीतील रुग्णांची केली सेवा

जानेफळ/विष्णू वाघ माजातील अनेक गरजू रुग्ण आर्थिक समस्ये अभावी व औरंगाबाद, अकोला सारख्या शहरा मध्ये उपचारा साठी जाणे शक्य होत नाही आणि ते सर्व आरोग्य सेवेपासून वंचित राहतात. गरजू रुग्णांची हीच निकड ओळखून, जानेफळ व परिसरातील गोरगरीब रुग्णांची सेवा व्हावी या उदात्त हेतूने सप्तशृंगी महिला अर्बनच्या अध्यक्षा कु. माधुरी देवानंद पवार यांच्या संकल्पनेतून १२ जून रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये 6207 रुग्णाना सेवा देण्यात आली व रुग्णांना मोफत औषध व चष्मे वाटप करण्यात आले  तसेच स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी कॉल्पोस्कॉपी या अतिमहत्त्वाच्या २८ तपासण्या  यावेळी  स्त्रीरोगतज्ञा कडून करण्यात आल्या.



यावेळी उदघाटक म्हणून स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांनी उपस्थित सर्वाना मार्गदर्शन केले. 

औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध डॉ.अमेय कोडलिकेरी यांनी स्त्रीयांच्या आरोग्य विषयी आपले मनोगत व्यक्त केले व सप्तशृंगी महिला अर्बनच्या आरोग्य शिबिराचे कौतुक करत सप्तशृंगी महिला अर्बन द्वारे जानेफल पंचक्रोशीतील रुग्ण केव्हा हि आमच्या दवाखान्या मध्ये येवो आम्ही त्यांच्या सेवेसाठी सदैव सज्ज असू असे प्रतिपादन यावेळी डॉ.कोडलिकेरी यांनी केले.



संस्थेच्या अध्यक्षा माधुरी पवार यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये बोलताना संस्थेच्या सामाजिक कार्याची उजळणी व आरोग्य शिबिर आयोजन करण्यामागची संकल्पना तसेच घराचा कणा असलेल्या महिलांचे आरोग्य सुस्थितीत असावे हेच माझ ध्येय आहे असे म्हणत

संस्थेच्या अध्यक्षा माधुरी देवानंद पवार यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले पुढे बोलताना त्या म्हणटल्या 

जनजागृती साठी पंचक्रोशीतील गावागावांमध्ये फिरत असतांना तुम्हाला दिलेल प्रत्येक आश्वासन आज तुमची लेक पूर्ण करत आहे समाजाच्या सर्वांगिन विकासाच व्रत सप्तश्रृंगी महिला अर्बन कायमच शिरोधार्य ठेवेल हे या निमित्ताने तुम्हाला आश्वासन देते असे वक्तव्य माधुरी पवार यांनी केले.


या आरोग्य शिबिराचा एकूण ६२०७ गरजूं रुग्णानी लाभ घेतला यावेळी आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉ. अमेय आर. कोडलिकेरी, बालरोग चिकित्सक डॉ. राहुल भराड, जनरल फिजिशियन डॉ. शैलेष पळसकर, जनरल फिजिशियन डॉ. उमेश मालू आहार तज्ञ डॉ. सागर झाल्टे, नेत्र तज्ञ डॉ. संजय ठोकरे इत्यादी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले व मार्गदर्शन केले.


या महाआरोग्य शिबिराचे सुत्रसंचालन प्रसिद्ध लेखक वकृत्व संपन्न व शब्दांची दौलत  असलेले मा.अजिम नवाज राही यांनी केले तर आभार पत्रकार  विष्णुभाऊ वाकळे यांनी मानले.

   सदर आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी सप्तशृंगी महिला अर्बनच्या सर्वच कर्मचारी वृंदानी मेहनत घेतली .

 या सर्व शिबिरा मध्ये उपचार घेतलेल्या शिबिरार्थीना योग्य मार्गदर्शन मिळाले आणि उपचारानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्याजोगे होते.

Post a Comment

0 Comments