बुलडाणा:- देशातील आरोग्य संघटनांच्या अहवालानुसार लहान मुलांमधे हृदयाचे आजार मोठ्या प्रमाणात दिसुन येतात. यास्तव लहान मुलांचे हृदयरोग तपासणी करणे गरजेचे आहे. यास्तव ज्युपिटर हॉस्पीटल ठाणे (मुंबई), जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा व आरबीएसके, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांचे हृदयरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य संघटनांच्या अहवालानुसार लहान मुलांमधे हृदयाचे आजार मोठया प्रमाणात दिसुन येतात. यास्तव लहान मुलांचे हृदयरोग तपासणी करणे गरजेचे आहे, यास्तव बुलडाणा येथे स्त्री रुग्णालय, धाड रोड, बसस्टँडच्या जवळ, बुलडाणा येथे दिनांक २४/०१/२०२५ शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत या हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जन्मजात हृदय रोगांची तपासणी, इकोकार्डीओग्राफी शस्त्रक्रियेतील नियोजन, जन्मजात हृदयरोगांसाठी परिवार आणि अनुवांशीकता मार्गदर्शन व पात्र लाभार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय योजनेचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार आहे. या शिबिरात ज्युपिटर हॉस्पीटल, ठाणे येथील सुप्रसिध्द बालहृदयरोग तज्ञ व श्रवण रोगतज्ञ डॉ. श्री. श्रीनिवास, इंटरवेशनल पिडीयाट्रीक कार्डियालॉजीस्ट डॉ. सोनिया कारापुरकर, फॅल्लोवफिटल कार्डियोलॉजीस्ट हे तपासणी करणार आहेत.
या शिबिराचे उद्घाटक बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. श्री. भागवत भुसारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्त्री रुग्णालय, बुलडाणाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्री. प्रशांत पाटील हे राहणार असुन प्रमुख पाहूणे म्हणून बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष श्री. राधेश्याम चांडक हे राहणार आहेत. तरी एकत्रीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार शिबिराचा लाभ परीसरातील १६ वर्ष वया पर्यंतच्या सर्व गरजु रुग्णांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments