Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची आमदारांचा पुढाकार

 


शिक्षकांच्या बदलीचा मुद्दा रेटून धरला ;  पोर्टल सुरू करण्याची केली मागणी !

 
आमदार देवेंद्र भुयार यांची ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत बैठक संपन्न ! 


मोर्शी तालुका प्रतिनिधी / मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिक्षकांच्या बदलीचा मुद्दा रेटून धरला व कोणत्याही परिस्थितीत ९ तारखेला पोर्टल सुरु करण्या बाबत आग्रह धरला असता ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ९ तारखेला पोर्टल सुरु होईल असे आश्वासन दिले. तसेच २७ मे च्या शासन निर्णयाशी शिक्षक बदलीचा काही सबंध नाही, बदल्या ह्या कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के होणारच असे आश्वासन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना यावेळी दिले. 


यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिक्षकांच्या समस्यांचा सोडविण्यासाठी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ह्या मागील तीन वर्षापासून राबविण्यात आल्या नाहीत. शिक्षक बदलीचे ऑनलाईन पोर्टल तयार झाल्या नंतर सामान्य प्रशासन विभागाचे दि .२७  मे २०२२ रोजी ३० जून पर्यंत बदल्या न करण्याबाबतचे पत्र निर्गमित केले यामूळे यावर्षी सुदधा जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला खीळ बसू नये. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली करीता सामान्य प्रशासन विभागाला मार्गदर्शन मागवावे व बदली प्रक्रीयेला मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्यात यावी. विषय शिक्षक म्हणुन पदोन्नती झालेल्या मेळघाटातील शिक्षकांना कार्यमुक्त करावे, आदीवासी भागात काम करणार्‍या शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता  वाढुन देण्यात यावा, वरिष्ठ वेनश्रेणी व निवडश्रेणीचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, शिक्षकांची सेवापुस्तके अद्यावत करण्याच्या द्रूष्टिने पंचायत समिती स्तरावर कॅम्प लावण्यात यावे, केंद्रप्रमुख, विस्तार अधिका यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत. यासह आदी समस्या सोडविण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली त्यावेळी बैठकीला शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, अविनाश पुसदेकर, श्याम खुंटे, सुनील मातकर, सुनील जाणे, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments