Ticker

6/recent/ticker-posts

आईची अस्थी शेतात पसरवून समाजात निर्माण केला नवा आदर्श



वाशिम | जुन्या चालीरीतींना नवे वळण देत वाशिममधील डोंगरे बंधूंनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला नवे वळण देत, डोंगरे बंधूंनी आपल्या आईची अस्थी शेतजमिनीत पसरवली आहे.


मंगरूळपीर तालुक्यातील झोलेबाबा येथे वास्तव्यास असणारे ज्ञानेश्वर डोंगरे, योगेश डोंगरे, हरेश्वर डोंगरे या बंधूंनी हे नवे पाऊल उचलत एक नवा क्रांतीकारी आदर्श निर्माण केला आहे. 


आपल्या देशातील विविध संस्कृतीनुसार घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास, त्याच्या अस्थी पाण्यात प्रवाहित करण्याची प्रथा आहे. मात्र डोंगरे बंधूंनी आपल्या आईच्या अस्थींना शेतजमिनीत पसरविल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


डोंगरे बंधूंच्या या नव्या वाटेचे सर्वांकडून कौतुक होत आहे. इतरांनीही पुढाकार घेऊन असा आदर्श निर्माण करावा, कारण ती काळाची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments