Ticker

6/recent/ticker-posts

जानेफळ येथे १२ जून ला भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन

 


सप्तश्रृंगीच्या अध्यक्षा माधुरी पवार यांची संकल्पना ; स्त्री रुगांनसाठी होणार महत्वाच्या तपासण्या

जानेफळ/विष्णू वाघ- समोर पावसाळ्याचे दिवस असल्याने रोग पसरतात. खेड्या - पाड्यातील महिला आजार अंगावर सोसतात. काळजी न घेतल्यामूळे रोग बळावतो. जानेफळ व परिसरातील गोरगरीब रुग्णांची सेवा व्हावी या उदात्त हेतूने सप्तश्रृंगी महिला अर्बनच्या अध्यक्षा कु. माधुरी देवानंद पवार यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या वतीने जानेफळ येथे १२ जून रोजी भव्य आरोग्य शिबीर, रुग्णांना मोफत औषध वाटप, डोळ्याच्या रुग्णांना चष्मे तर स्त्रीयानंसाठी अतिशय महत्वाची असणारी कॉल्पोस्कॉपी तपासणीही होणार आहे.

स्थानिक जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत आयोजित या भव्य शिबीराचे उद्‌घाटन प.पू. परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वातीजी महाराज ( वेदांताचार्य, एम. ए. तत्वज्ञान, काशी ) यांचे हस्ते होणार असून यावेळी सदर आरोग्य शिबीरात तज्ञ डॉक्टर स्त्रीरोग तज्ञ डॉ. अमर आर. कोडलीकेरी, बालरोग चिकित्सक डॉ. राहूल भराड, जनरल फिजिशियन डॉ. शैलेश पळसकर, डॉ. उमेश मालू, आहार तज्ञ डॉ. सागर झाल्टे, नेत्र तज्ञ डॉ. संजय ठोकरे, हे रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार करणार आहेत.

( ही लक्षणे असणाऱ्या रुग्णाची तपासणी )

     छातीत दुखणे, जळजळ करणे, श्वास घेण्यास त्रास होणे, स्तनानील गाठ ,कॅन्सरची प्राथमिक तपासणी, वजनातील अनपेक्षित घट, अंगावरून पांढरे पाणी जाणे, अतिरिक्त रक्तस्त्राव, पाळी थांबल्यावर रक्तस्त्राव, अंग बाहेर येणे, गर्भ व्यंग, आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी करता येईल.

 ( आरोग्य शिबीरातील सेवा.)

रकनदाब, मधुमेह, वजन, इसीजी तपासणी, चेष्म्याचे नंबर काढणे , मोतीबिंदु, काचबिंदु, तिरळेपणा, डोळ्याचे सर्व आजार निदान व उपाचार सर्व आरोग्य विषयक समस्याचे निराकरण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे .

       रुग्णांची मोफत नांव नोंदणी, रुग्ण तपासणी नंतर मोफत औषधी ,स्त्रीयांसाठी अतिशय महत्वाची असणारी कोल्पो स्कोपी तपासणी सुद्धा मोफत करण्यात येणार आहे .

 या शिबिरासाठी कोडलिकेरी मेमोरीयल हॉस्पीटल, औरंगाबाद तथा व्यंकटेश नेत्रालय मेहकर, यांचे विशेष सहकार्य असणार आहे . तरी मेहकर तालुक्यातील व परिसरातील जनतेने या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सप्तश्रृंगी महिला अर्बन को.ऑप. क्रे. सोसा. चे संस्थापकअध्यक्ष देवानंद पवार, अध्यक्षा कु . माधुरी देवानंद पवार, उपाध्यक्षा सौ संगिता विष्णु वाकळे, व्यवस्थापक सुभाष सिताराम खरात तसेच संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments