Ticker

6/recent/ticker-posts

रोजगार हमीचे मजुरीचे पैसे न मिळाल्याने मजुरांनी सोडले गाव

 


अधिकारी पारितोषिक घेण्यात मग्न, चार, महिन्या पासून मजुरीचे पैसे मिळालेच नाही

नितीन वरखडे -चिखलदरा तालुका प्रतिनिधी (मेळघाट)

चिखलदरा तालुक्यामध्ये गेल्या मार्च महिन्यात अगोदर महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामे सुरु होती आदिवासी नागरिकांना शंभर दिवस मंजुरी देण्यास शासन कटिबद्ध होतं परंतु शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून आदिवासी मजुरांना उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे.

होळी उत्सव होऊन गेला तरी, आदिवासी नागरिकांना, मजुरांनाकष्टाची एकदमडी सुद्धा मिळाली नसल्याने तालुक्यातील मजूर हाकामासाठी मेळघाट सोडून इतरत्र गाव सोडून गेले असे दिसत आहे,शासकीय अधिकारी मोठ मोठ्या गप्पा घोषणा देत ऑल इज वेल रोजगार हमी योजनेचे पारितोषिक घेण्यास मग्न होते वरिष्ठ स्तरावर खोटा, उदो उदो करत असल्याचे दिसून येते, बारा कोटी 50 लाख रुपये रोजगार हमी योजनेचे मजुराचा निधी पंचायत समिती विभागा कडुन  प्रस्तावित होता, परंतु 12 कोटी 50 लाख रुपये मधून, तीन कोटी रुपये मान्यता देण्यात आल्यानेनऊ कोटी रुपये वरिष्ठ विभागा च्या ऑफिस कडून मिळाले नसल्याचे समजले,त्या मुळे रोजगार हमी योजनेत हे चालले तरी काय असा प्रश्न नागरिक करत आहेत.

आम्ही संबंधित पंचायत समिती कडे याबद्दलची माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की जॉब कार्ड विभक्तीकरण झाल्याशिवाय1600,मजुराचे जॉब कार्ड नवीन खाते पुस्तके काढल्या शिवाय थकीत असलेली रक्कम, अदा करण्यात येणार नाही, त्यामुळे  सुशिक्षित आदिवासी गरीब मजूरकष्ट करून ही आर्थिक विचारात सापडलेला आहे. चिखलदरा तालुक्‍यात आता पर्यंत 3032 खाते रोजगार हमी योजनेचे होते असे दिसून येते.शासनाने या मजुरीचे पैसे तात्काळ द्यावे अशी मागणी देखील बरेच दिवसा पासून मजूर वर्ग करत आहेत परंतु वास्तव शासनाचे वेगळे आहे. "अधिकारी मारल्यासारखे करतात ; आणि "रोजगार सेवक रडल्या सारखे:अशी गत रोजगार हमी योजनेची झाली असून चिखलदरा तालुक्यातील अनेक तरुण बेरोजगार मजुरांनी व वयोवृद्धमजुरांनी पोटाची खळगी भरण्या साठी गावे सोडले असल्याचे दिसून येते आता या मुजराची थकीत रक्कम कधी मिळणार अशी आस या कामगार मजुरांनी उराशी बाळगून धरली आहे. आता तरी पावसाळ्या अगोदर संबंधित खात्याला लाज-शरम असेल तर या गरीबाची रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी जनसामान्य नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments