Ticker

6/recent/ticker-posts

संस्कार दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

ऍड. अनिल लव्हाळे यांच्या संकल्पनेतून साकारला मावळ्यांचा इतिहास



अकोला: राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत ऍड. अनिल लव्हाळे  यांच्या संकल्पेनेतून साकार झालेल्या संस्कार दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.  स्थानिक बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील आवारे कोचिंग क्लासेस येथे सदर सोहळा पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बीजीइ सोसायटीचे अध्यक्ष अँड. मोतीसिंहजी मोहता तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक कवी किशोर बळी, पत्रकार-लेखक चंद्रकांत झटाले, दास मोबाईलचे  रितेश मिर्झापुरे व आवारे क्लासेसचे संचालक प्रा. योगेश आवारे उपस्थित होते.  

             संस्कार दिनदर्शिका द्वारे ऍड. अनिल लव्हाळे यांनी छत्रपती शिवराय यांच्या मावळ्यांचे कर्तृत्व, पराक्रम, निष्ठा,स्वराज्यसाठी त्यांच्या योगदानाबद्दल माहिती देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला आहे. सदर संस्कार दिनदर्शिकेचे उत्कृष्ट ग्राफिक डिझाईन नितीन वर्गे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बासरीवादक आशिष उमाळे यांनी तर आभार नितीन वर्गे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला नरेंद्र चिमणकर, डिगंबर सांगळे, विजय बुरकुले उपस्थित होते.    कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पंकज दुधाट,  ऍड. रवी शर्मा, कौशिक पाठक, ऍड.भूषण ढोरे व साक्षी सुर्वे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments