Ticker

6/recent/ticker-posts

वटवाघूळांमध्ये आता नव्या विषाणूचा धोका; राज्यात प्रथमच आढळला हा विषाणू



पुणे | कोरोनामुळे आधीच देशात अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. एकीकडे हे संकट अजूनही टळलेले नाही तर दुसरीकडे आता कोरोनानंतर निपाह व्हायरसचा धोका वाढलेला दिसून येत आहे. 


2018 च्या सुरूवातीला केरळमध्ये निपाह व्हायरसने थैमान घातले होते. 'फ्रुटस बॅट' या प्रजातीच्या वटवाघुळामध्ये हा विषाणू नैसर्गिकरित्या आढळून येतो. त्यामुळे जगभरात या व्हायरसचे जाळे पसरले होते. मात्र आता हा विषाणू प्रथमच महाराष्ट्रातील वटवाघूळांमध्ये आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.


राज्यात असलेल्या वटवाघुळांच्या प्रजांतीपैकी दोन प्रजातींमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ञांनी याबद्दलचे संशोधन केले आहे. त्याचबरोबर राज्यात हा विषाणू दाखल होण्याची पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


निपाह विषाणु असलेल्या वटवाघुळांच्या प्रजाती साताऱ्यातील गुफेत मार्च 2020 मध्ये आढळून आल्या आहेत. हा विषाणू वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो.


याआधी राज्यात कधीही वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला नसल्याची माहिती याबाबत संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली आहे. या विषाणूमुळे उत्पन्न होणा-या आजारावर कोणतीही लस किंवा औषधी उपलब्ध नसल्याने या विषाणूचा धोका जास्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


कोरोनाचा रिकव्हरी रेट पेक्षा निपाहचा मृत्यूदर जास्त आहे. वटवाघुळांमध्ये विविध प्रजाती आहेत. त्यापैकी ऑनीटेक्टेरिस स्पोलिया, ग्रेटर इंडियन फ्लाइंग फॉक्स, हिप्पोसिडेरस लार्वाटस आणि स्कॉटोफिलस कुहली या वटवाघुळांमध्ये निपाह विषाणु आढळून येतो.

Post a Comment

0 Comments