Ticker

6/recent/ticker-posts

निसर्गावर प्रमे करा, माणुस व्हा- व्याख्याते गणेश शिंदेबुलडाणा - मर्यादीत क्षेत्रात अमर्याद काम करावं हे महात्मा बांधी यांचें विचार मला फार आवडतात.तसंच काम करणंहीं मला आवडतं.जोपर्यंत माणसाच्या मनात करूणा,प्रेम आहे तोपर्यंतच माणुस होता येते पण माणसाने यंत्र होऊ नये माणुस होता आले पाहिजे, थकलेल्या माणसाच्या पाठीवर थाप  ही सुध्दा एक समाजसेवाच आहे. जी माणसे मातीत मिळतात त्यांना वर काढता आलं पाहिजे. जसे डॉक्टर,इंजिनिअर (अभियंता) बनणारी यंत्रणा आहे अगदी तशीच माणुस बनविणारीही यंत्रणाही तयार व्हायला पाहिजे, निर्सगावर प्रेम करा निसर्ग भरभरून देतो पण प्रेम कमी झालं की  निसर्ग पुन्हा घेवूनही जातो, असे सांगून त्यांनी म्हणूनच निर्सगावर प्रेम करा, माणुस व्हा, असा मोलाचा सल्या आपल्या तासाभराच्या व्याख्यानात प्रसिध्द वक्ते गणेश शिंदे यांनी दिला. बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ,नागपुर व बुलडाणा अर्बन यांच्यावतीने संयुक्तरित्या सहकार विद्या मंदीर च्या सभागृहात आयोजित या सोहळ्याला बुलडाणा वासियांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी सभागृह जागा नसल्याने बाहेरही स्क्रीनवर हा सोहळा शेकडो नागरिकांनी बघितला. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी या विषयावर  माणसाने माणसाशी माणसासम वागणे या विषयावर बुलडाणा जिल्हा समाजसेवी गौरव पुरस्कार सोहळा तसेच व्याख्यान व सत्कार कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून गणेश शिंदे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राधेश्याम चांडक उर्फ भाईजी  हे होते. तर उद्घघाटक म्हणून वैराग्यमुर्ती हिवरा आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,माजी आमदार तोताराम कायंदे,नागपुर मंडळाचे माजी अध्यक्ष वाघ साहेब, मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक डॉ.नामदेवराव सास्ते, बुलडाणा नागरिक मंडळाला नागपुरात भूखंड मिळवून देण्यासाठी मोलाची मदत देणारे जेष्ठ सदस्य भैय्यालालजी राजपूत,विघमान अध्यक्ष भगवान मुंढे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव विद्याधर महाले, राजेंद्र वाघ,डॉ. सुकेश झंवर, डॉ. विकास बाहेकर, एस. पी. भालके सर,हिवरा आश्रमचे सचिव संतोष गोरे,डॉ. तेजराव नरवाडे,राजेश हेलग, डॉ. राजेश्वर उबरहंडे आदिंची यावेळी उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमेचे पुजन आणि द्वीप प्रजवलन करून या  समारंभाला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीलाच जी. एस. कालेजच्या विद्याथ्थी युवक-युवतींनी बहारदार नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या विद्यार्थ्थांना सचिन काळे यांनी 5 हजार रूपये बक्षीस दिले. यावेळी भाईजी यांनी थोडक्यात आपले विचार यावेळी व्यक्त केले. त्यांनी आपण गेल्या 10 वर्षांपासून असून नागपुरात होस्टल व बुलडाणा जिल्हा नागरिक भवन बांधण्यासाठी पुढाकार घेत असून यातुन मनशांती,पुण्य मिळेल असं सांगून एका श्रीकृष्ण मंदीरावर सुंदर वाक्य लिहलं होतं ज्याचं भावाशी पटत नाही त्यानं माझं दर्शन घेवू नये, यातच सर्वकाही आलं असे सांगून पुण्यात गेल्यात लोक काहीच एकत नाही असं का? होतं याबद्दल खतं व्यक्त केली.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड पुरूषोत्तम पाटील पडघान यांनी केले. यावेळी त्यांनी एक बुलडाणा मंडळाचा कार्यक्रम बुलडाण्यात व्हावा अशी संकल्पना उद्योगपती व माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांची होती. त्यानुसार हा सोहळा होत असल्याचे सांगून मंडळाचे यापुर्वी समाजसवेचे दोन पुरस्कार वितरण झाले आहेत तर आतचा हा तिसरा तर कै. चद्रप्रभा  बळीराम पाटील पडघान स्मृती हा पहिला पुरस्कार आहे. जिल्हाचे आम्ही भूमिपुत्र नागपुर शहरात एकत्रीत होऊन एकमेकांच्या आधारावर ही संघटना 30 वर्षापूर्वी उभी केली. भाईजींच्या माध्यमातुन उपराधीत बुलडाणा भवन उभे राहील त्याचा जिल्हातील मुलांना उपयोग होईल. भाईजींसोबत यापुढेही काम करत राहु अशी  अ‍ॅड. पुरूषोत्तम पडघान पाटील यांनी ग्वाही देऊन बुलडाणा अर्बन परिवाराचे आभार मानून भाईंजीचे ऋुण व्यक्त केले. कार्यक्रमाचे मनोगत भगवान मुंढे यांनी करून आमचा मातृभूमीच्या ऋुणातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सांगीतले. आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडापट्टू अनुराधा सोळंकी हिला सचिन काळे यांच्या वतीने 11 हजार रूपयाचे रोख बक्षीस यावेळी दिले. तर आंतरराष्ट्रीय तिरंदाज पदक विजेता प्रथमेश जावकर यांच्या आई-वडील आजोबांनी दिव्या फाऊंडेशनला 5 हजार रूपयांची रक्कमेचा धनादेश दिला. देवानंद मगर यांनीही क्रीडापट्टू मानाली जाधव हिला बक्षीस 5 हजार रूपये बक्षीस दिले. काळे व मगर यांचा यावेळी राधेश्याम चांडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम थोडक्यात व्यक्त केला. यावेळी दिव्या फाउंडेशनचे संचालक अशोक काकडे यांना त्यांच्या मनोरूग्ण सेवेकरिता मातोश्री कै. चंद्रप्रभा बळीराम पडघान पाटील स्मृती बुलडाणा जिल्हा समाजसेवी गौरव पुरस्कार सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील गुणवतांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळाचे उपाध्यक्ष संजय मारवाडी,सचिव अनंत भारसाकळे, प्रल्हाद खरसणे, वामन शास्त्री, राजीव सावळे, अ‍ॅड.विजय वानखेडे, मुकेश गुजराती,प्रा. प्रमोद उबरहंडे, संजय कुलकर्णी,रमेश शेवाळे, मुरलीधर आढाव,  आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन पत्रकार सिध्देश्वर पवार यांनी केले तर आभार बुलडाणा जिल्हा नागपुर मंडळाचे सचिव अनंत भारसाकळे यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातून आलेले  व बुलडाणा शहरातील शेकडो  नागरिक या सोहळयाला
उपस्थित होते.  यावेळी बुलडाणा अर्बन परिवाराने सर्व
उपस्थित नागरिकांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली होती.
 
या नवरत्नांचा झाला विशेष सत्कार
यावेळी आंतरराष्ट्रीय तिरंदाज सुवर्णपदक विजेता प्रथमेश समाधान जवकार,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक चंद्रकांत इलग,उपजिल्हाणिकारी ललित कुमार वर्‍हाडे,जेष्ठ साहित्यीक मधुकर वडोदे, 7 आंतरराष्ट्रीय पदके विजेती अनुराधा सोळंकी,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय क्रीडापटू मोनाली जाधव,आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन खेळाडू करण राजु पागोरे यांच्यासह  प्रशासकीय अधिकारी ललितकुमार वर्‍हाडे, नित्यानंद प्रकल्पाचे समाजसेवी अनंत शेळके, फेलो रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स लंडन राजु केंद्रे या सर्व मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील नवरत्नांचा विशेष सत्कार यावेळी  भरगच्च सोहळयात सत्कार करून त्यांना पुष्पगुच्छ,शाल,पुरस्कारचे सन्मानपत्र देण्यात आहे. जिल्हा गौरव पुरस्काराचे सत्कार मुर्ती मनोरूग्णासाठी अविरत कष्ट उपसणारे बुलडाण्याचे बाबा आमटे अशोक काकडे यांना सपत्नीक मानपत्र,शाल,पुष्पगुच्छ व 21 हजारांचा धनादेश यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी रंगोली पडघान पाटील यांनी व्यासपीठावर मानपत्राचे वाचन केले.  यावेळी दिव्य सेवा प्रकल्पाची डाक्युमेंट्री स्क्रीन वर उपस्थितांना दाखविण्यात आली. अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य निवडून आल्याबद्दल व्याख्याते गणेश शिंदे यांच्याहस्ते डॉ. राजेश्वर उबरहंडे तसेच चिखला गावाचे सरपंच पराग वाघ यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
 
बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ,नागपूरकडून दिव्या फाऊंडेशनला 2 लाख 11 हजाराची मदत
बुलडाणा नागरिक मंडळाचे जेष्ठ सदस्य मार्गदर्शक बुलडाण्याचे सुपुत्र उद्योगपती माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्यासह बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळाच्या जेष्ठ सदस्यांनी पुढाकार घेवून एकत्रीत रित्या निधी जमा करून दिव्या फाऊंडेशनच्या बांधकामासाठी 2 लाख 11 हजार रूपयांची रोख स्वरूपात भरीव मदत दिली.या मदतीतून मनोरूग्णांसाठी पक्का निवारा उभारण्यास हातभार लागणार आहे. या मदतीबद्दल काकडे यांनी बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळाचे ऋुण व्यक्त केले आहे. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments