Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भ वंचित माळी परिषदेने केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध



अकोला- अकोला येथे पार पडलेल्या विदर्भ वंचित माळी परिषदेने दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव  साहेब यांच्या पत्नी प्रज्ञाताई सातव यांना हक्काची राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध केला आहे।
मागील काही महिन्यांपूर्वी  हिंगोली चे  खासदार  राज्यसभा सदस्य, तथा गुजरात राज्याचे प्रभारी,व माळी समाजाचे प्रमुख नेतृत्व राजीव सातव साहेब यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले होते,राजीव सातव साहेब यांनी काँग्रेस पक्षातील मंत्रीपद नाकारून फक्त काँग्रेस संघटनेत काम करून पक्ष वाढीचा कार्यक्रम हाती घेतला होता। राजीव सातव साहेब यांचे पक्षातील संघटन तसेच जनसामान्य लोकात असलेली निष्ठा यामुळे ते मोदिलाटेत  सुद्धा निवडून आले होते हे विशेष.

सातव साहेबांचे पक्ष संघटन व कार्य लक्षात घेता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांच्या पश्चात रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रज्ञाताई सातव यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या माजी राज्यसभा सदस्य राहिलेल्या व  ग्राउंड लेव्हल वर कोणत्याही प्रकारचे कार्य नसणाऱ्या रजनी पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या माळी समाजावर एकप्रकारे अन्यायच केला आहे,त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला याची मोठया प्रमाणात  नक्कीच किंमत चुकवावी लागणार आहे हे निश्चित.

विशेष आश्चर्य म्हणजे रजनी पाटील यांचे नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत सुद्धा समाविष्ट आहे,तरी सुद्धा माळी समाजातील उमेदवार नकोच ही हीन भावना ठेऊन सर्व  राज्यातील काँग्रेस च्या  जेष्ठ नेत्यांनी प्रज्ञाताई सातव यांना उमेदवारी मिळू नये यासाठी हायकमांड कडे साकळे घातल्याचे समजले आहे,त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या या जातीविरोधी धोरणाचा फटका हा येणाऱ्या काळातील निवडणुकात या पक्षाला निश्चितपणे भेटणार यात शंका नाही.

प्रज्ञाताई सातव यांनी पडतीच्या काळात हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष सांभाळला आहे,तसेच प्रज्ञाताई ह्या अतिशय जबाबदार,मेहनती नेत्या आहेत,त्यांना पक्षाचे संघटन व कार्य यांचा खूप अभ्यास आहे तसेच त्यांची तळागाळातील सामान्य जनतेशी नाळ जुळलेली असल्याने त्या राज्यसभेसाठी  उमेदवार म्हणून महत्वाच्या होत्या,मात्र त्यांची उमेदवारी ही हेतुपूर्वक नाकारण्यात आली त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व काँग्रेस चे कार्यकर्ते व राजीवभाऊ सातव यांचे निष्ठावान लोक दुखावले गेले आहेत।प्रज्ञाताई सातव यांची उमेदवारी नाकारून एकप्रकारे काँग्रेस पक्षाने दिवंगत राजीव सातव साहेबांच्या कार्याला न्याय दिला नसल्याचे व माळी समाजाची काँग्रेस पक्षात किंमत शून्य असल्याचे दाखवून दिले आहे.

काँग्रेस पक्षाने प्रज्ञाताई सातव यांची उमेदवारी नाकारल्याने राज्यातील माळी समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या असून काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करत आहेत।त्याच पार्श्वभूमीवर आज  विदर्भ वंचित माळी परिषदेचे अध्यक्ष ,माळी समाजाचे जेष्ठ नेते ऍड.संतोष राहाटे साहेब यांनी त्यांच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावून घेतली.

सदरील बैठकीत माळी समाजाचे दिवंगत नेते राजीवभाऊ सातव साहेब यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञाताई सातव यांची हक्काची राज्यसभेची  उमेदवारी ऐनवेळी काँग्रेस पक्षाने नाकारल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यात आला।
बैठकीचे अध्यक्ष गणेशराव म्हैसने हे होते तर बैठकीसाठी माळी समाजातील जेष्ठ नेते ऍड.नरेंद्र बेलसरे,शंकरराव गिर्हे,आशीष मांगुळकर,जे.पी.राऊत सर,सुभाष भड,श्रीकांत ढोमने, सुभाष भड,दिगंबर म्हैसने, प्रकाश उगले, मोहन दाते,पंडितराव वाघमारे, अरविंद उमाळे,विनोद भोपळे,प्रवीण निलखन,अक्षय ढोकणे, अमोल कलोरे,निलेश झाडे, यासह माळी समाजातील नेते व युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments