बुलडाणा, -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्याचे तालीबाणी सरकारने कायदा शासन प्रशासनाचा गैरवापर करून जबरदस्तीने एखाद्या गुंड व दहशतवादी प्रमाणे अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ भाजपा बुलडाणा शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन आज दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता जनसेवा कार्यालयात करण्यात आले.
या प्रसंगी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा करून नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, जिल्हा उपाध्यक्षा विजया राठी, तालुकाध्यक्ष अॅड. सुनिल देशमुख, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, नगरसेवक अरविंद होंडे, महिला शहराध्यक्षा वर्षा पाथरकर, आशिष व्यवहारे, मंदार बाहेकर, नारायण तोंडीलायता, नितीन दासर, युवा मोर्चाचे सोहम घाडगे, अॅड. दशरथ राजपूत, नितीन बेंडवाल, योगेश राजपूत, आसिफ भाई, लखन मोरे, पद्मनाभ बाहेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments