Ticker

6/recent/ticker-posts

स्वच्छता न राखल्यास गुन्हे दाखल करू

उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांचा कायद्याचा इशारा



जिल्हा प्रतिनिधी/राजेश ढोले
पुसद- उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या कार्यकर्तृत्व मुळे आज कोरोना हद्दपार करण्याच्या लढाईमध्ये सर्वांचाच सहभाग आढळून येत आहे सोबतच जैन यांच्या कायदा-सुव्यवस्थेचा सोबतच समाजशीलता कर्तव्यप्रति प्रामाणिकपणा, गुन्हेगाराला दंडुका आणि सामाजिक कार्यकर्त्यांना शाबासकी अशा आपल्या कार्य प्रवृत्तीमुळे सर्व स्तरातून जैन यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत असल्याने पोलिस अधिकारी असावा तर असा अशा भावना निर्माण होऊन पोलिसांप्रती आदरयुक्त भीती निर्माण झाली आहे. 
पुसद शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे तंतोतंत पालन होत आहे की नाही, नागरिक सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत आहे की नाही, मास्क, सॅनिटायझर चा वापर करीत आहे की नाही, यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी जैन मागील आठवडाभरापासून अनेक मोहिमा राबवल्या. 

अनेक व्यापारी, विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सह कोरोणा टेस्टिंग न करणाऱ्याना टेस्टिंग, लसीकरण व कोरोणा नियमाचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.

 त्यात नुकत्याच झालेल्या पोलीस महसूल आणि नगरपालिकाचे संयुक्तिक कारवाईनंतर स्टिंग ऑपरेशन करीत "शटर बंद दुकान चालू" असा कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना यावर वचक निर्माण करीत जैन यांनी स्वतः खेड्यातील एका नागरिकाचा वेश परिधान करीत ग्राहकाच्या भूमिकेतून व्यापा-यावर स्टींग ऑपरेशनची कारवाई पहिल्यांदाच पाहताना आढळून आली.
        आज सर्वत्र पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती निर्माण करण्याचे कार्य डीवायएसपी अनुराग जैन यांच्या मार्फत पुसद उपविभागात केल्या जात आहे.  त्यामूळे कोरोना नियमाचे पालन करताना दिसत आहे अशात आज त्यांनी आपल्या अनोख्या आवाहनाने  सारेजण अवाक झाले. कायदा व सुव्यवस्था राखत असताना वसंतनगर भागामध्ये नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या स्वच्छतेनंतर आढळून आलेली घाण पाहताच त्यांनी तातडीने नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलवुन घाण साफ करण्यासोबतच नागरिकांना सुद्धा यानंतर अशा पद्धतीने अस्वच्छता आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल अशी ताकीद नागरिकांना दिली.

 यावेळी नागरिकांनी सुद्धा अशा अधिकाऱ्यांचे कौतुक करीत कायदा व सुव्यवस्था राखण्या सोबतच पहिल्यांदा पोलीस स्वच्छतेबाबत कारवाई करताना दिसत असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments