Ticker

6/recent/ticker-posts

या बहाद्दराने चोरली बस, फक्त बायकोला भेटण्यासाठी




तिरुवनंतपुरम | अनेक ठिकाणी लाॅकडाऊनमुळे वाहतूक सेवा बंद असल्याने, अनेकजण आपल्या कुटूंबापासून अजूनही दूर आहे. त्यामुळे आपल्या कुटूंबियांना भेटण्यासाठी काही व्यक्ती वेगवेगळा मार्ग शोधत आहे. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. जेथे युवकाने चक्क बस चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 


कुटूंबापासून दूर असलेल्या 30 वर्षीय दिनूप ने आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. कोझिकोड येथून 270 किलोमीटर लांब असलेल्या तिरुवल्ला गावातील दिनूप हा रहिवासी आहे. कामासाठी तो बाहेरगावी असतो. 


अनेक दिवसांपासून कोरोनामुळे घरी न गेल्याने त्याने कुटूंबाच्या भेटीसाठी कोझिकोडच्या बसस्थानकावर उभी असलेली एक खाजगी बस त्याने शनिवारी चोरली. कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्याने चार जिल्ह्याच्या सीमा ओलांडल्या, त्यासाठी रात्रभर बस चालविण्याची जोखीम उचलली. मात्र आपल्या जिल्ह्यात पोहोचून त्याला घरी न जाता ठाण्यात हजेरी द्यावी लागली.


जिल्ह्यात पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलिसांनी चौकशी केली असता, आपण पथनमथिट्टा जिल्ह्याच्या तिरुवल्लामध्ये राहत असून पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी आलो असल्याचं दिनूपने पोलिसांना सांगितलं.

Post a Comment

1 Comments

  1. Bahoot acha kiya bhai ne 21 toopo ki salami dena bhai ko

    ReplyDelete