Ticker

6/recent/ticker-posts

श्रावण महिन्यात शिवमहापुराण कथेचे आयोजन प्रवक्ता-बालसंत श्री दिपशरणजी महाराज, चित्रकुट धाम - राधेश्याम चांडक



बुलडाणा :-सद्भावना सेवा समिती, बुलडाणा द्वारा वारकरी भवन सर्क्युलर रोड, बुलडाणा येथे दि.०४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२५ पर्यंत श्रावण महिन्यात बालसंत, बालव्यास श्री दिपशरणजी महाराज, आरोग्य धाम, चित्रकुट धाम यांच्या अमृतवाणीतुन शिवमहापुरण कथेचे आयोजन केले आहे.

भारतीय संस्कृतीत अध्यात्माच्या दृष्टीने श्रावण महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो. अध्यात्मीक सत्संगाचे आयोजन अनेक ठिकाणी होत असते. गेल्या पंचवीस वर्षापासुन सद्भावना सेवा समिती अश्या सत्संगाचे आयोजन करीत असते. शहरातील भव्य वारकरी भवन सर्क्युलर रोड, बुलडाणा येथे सात दिवस दुपारी २ ते ६ या वेळेत शिवकथा होणार आहे. बारा ज्योतीर्लंगाची स्थापना, दररोज बारा कुटुंबाद्वारे अभिषेक, झांकी, शोभा यात्रा इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध समाजाची महिला मंडळे कथेची जबाबदारी विभागुन घेतात यामध्ये प्रामुख्याने माहेश्वरी समाज महिला मंडळ, जैस्वाल समाज, जांगीड समाज, गुरव समाज, परशुराम ब्राम्हण समाज, वर्मा समाज, सिंधी, पंजाबी, गुजराती समाज महिला मंडळ, राजपूत समाज मंडळ, अग्रवाल समाज महिला मंडळ, मराठा समाज महिला मंडळ, लेवा पाटील भातृमंडळ सहभागी होतात. सात दिवसात विविध प्रसंग कथेच्या माध्यमातुन विशद केले जातात. शिवमहापुराण कथेचा लाभ सर्व शिवभक्तांनी घ्यावा असे आवाहन सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, विजय सावजी, प्रकाशचंद्र पाठक, सुरेश गट्टाणी, सिध्दार्थ शर्मा, उमेश मुंधडा, तिलोकचंद चांडक, सुभाष दर्डा, लाला माधवाणी, पुरणमल शर्मा, मनमोहन शर्मा आदी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments