Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! लसीकरण करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची केली नसबंदी

From Pixabay


लखनऊ | कोरोनाचा धोका लक्षात घेता आणि तिसरी लाटेवर मात करता यावी यासाठी शासनाकडून लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. परंतू लस घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीसोबत एक विचित्र प्रकार घडल्याने, सर्वांनाच धक्का बसला आहे.


लसीकरण करतांना ही चूक झाल्याची धक्कादायक बातमी उत्तर प्रदेशातून पुन्हा समोर येत आहे. आशा वर्करकडून एका मुकबधिर तरुणाला कोरोनाची लस देण्याचे सांगून लस देण्याऐवजी, त्या युवकाची नसबंदी करण्यात आल्याची घटना पुढे आली आहे.


नसबंदी केल्यानंतर बेशुद्ध अवस्थेतच त्या मुलाला आशा वर्करने घरी सोडले आहे. हा प्रकार पीडित युवकाच्या भावाला समजताच त्याने संबंधित आशा वर्करविरोधात अवागढ येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


मुकबधिर युवकाचा भाऊ अशोक कुमार याने संबंधित आशा वर्करकडे जाब विचारला असता, 20 हजार रुपये घेऊन प्रकरण मिटविण्याचे, तिने म्हटल्याचे अशोकने सांगितले आहे.


या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

1 Comments

  1. Bet365 Casino & Promos 2021 - JTM Hub
    Full list of Bet365 Casino 출장안마 & Promos · Up sol.edu.kg to £100 in Bet Credits for new customers at bet365. Min deposit £5. Bet https://febcasino.com/review/merit-casino/ Credits available 출장마사지 for use ventureberg.com/ upon settlement of bets to value of

    ReplyDelete