Ticker

6/recent/ticker-posts

कोणत्याही वेदनेसाठी शहरात खास वेदना तज्ज्ञही आहेत!

 

Dr Namrata Narendra Bhagwat Akola 1
Dr Namrata Narendra Bhagwat Akola 2
Dr Namrata Narendra Bhagwat Akola 3 copy
Dr Namrata Narendra Bhagwat Akola 4 copy

जसं गर्भाशयाचं काही झालं की आपण स्त्रीरोगतज्ज्ञाकडे जातो, हाड मोडलं की हाडांच्या डॉक्टरकडे तसं आता...  कोणत्याही वेदनेसाठी शहरात खास वेदना तज्ज्ञही आहेत!

आपल्या गावाकडे किंवा शहरात डॉक्टर म्हणजे बहुतेक फक्त फॅमिली डॉक्टर, हाडांचे डॉक्टर (ऑर्थोपेडिक), स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा त्वचारोगतज्ज्ञ एवढंच माहीत असतं. पण आजकाल विज्ञान एवढं पुढे गेलंय की फ  क्त वेदनांवरच विशेष लक्ष देणारा 'पेन मॅनेजमेंटÓ हा एक वेगळा विभागच उभा राहिलाय.
हल्लीच सलमान खान ने त्याला ट्रायजेमैनल नुरलजीआ असल्याचे सांगितले म्हणजे अचानक चेह:यावर जबरदस्त वीज चमकल्यासारखी वेदना येणे आणि लगेच गायब होणे. हे इतके भयानक दुखणे असते की माणूस ब्रश करणे, पाणी पिणे. चेह:यावर वारा लागू नये म्हणून पंखा वापरणे बंद करतो. औषध ने काही लोकांना आराम पडतो पण कित्येक लोक वर्षे एन वर्ष फक्त गोळ्या घेत असले तरीही काही आराम नाही पडत. अश्या स्पेशल केस साठी पेन मैनेजमेंट मधे स्पेशल इंजेक्शन्स असतात ज्याने कमीत कमी औषधात आराम पडतो व रुग्ण साधे आयुष्य जगू शकतो.किती लोकवर्षानुवर्षं मान दुखतेय, कंबर दुखतेय म्हणून नुसत सहन करत बसतात.
 काहींना डिलिव्हरीनंतर कमर निटट होत नाही, कुणाला फु लांच्या माळा करत बसल्यामुळे खांदा-मनगटात सतत वेदना. काहींना नागिण (हर्पीस) गेल्यावर महिनोन्महिने करंटसारखी झिणझिण चालूच. नागिणीचा त्रास खूप असतो. वृद्ध माणसं गुडघ्यांना हात लावून हळूच चालतात. काहींचं ऑपरेशन झालं तरी दुखणं थांबत नाही. 
यात अनेकांना ऑपरेशनची अजून वेळ आलेली नसते, किंवा काहींना ऑपरेशन होऊनही त्रास राहिलेला असतो. आता फक्त गोळ्या, मलम, शेक, पट्टी करून राहण्याचे  दिवस गेले.
 विशेषत: पेन मॅनेजमेंट तज्ज्ञ तुमच्या या वेदनांच्या मुळाशी जाऊन उपचार करतात. यामध्ये आधुनिक पद्धतीने नर्व ब्लॉक्स, इमेज गाईडेड इंजेक्शन्स, सोबत विशेष 'फिसिओथेरपीस्टÓकडून  किंवा विशिष्ट  औषधोपचार करून वेदना नक्कीच कमी करता येतात.
आजकाल तरुण आईटी कर्मचारी, संगणकावर सतत बसणारे, किंवा मोबाईलवर तासन्-तास मान वाकवून खेळणारी मुलंही मानेच्या व पाठीच्या वेदनेने त्रस्त आहेत. पूर्वी वयाच्या 50-60 नंतर दिसणारे आजार आता 25-30 वयात दिसू लागलेत.
कितीतरी गृहिणी हळूहळू मान, खांदा, माकड हाड च्या त्रासाने त्रस्त असतात. फुलांचे हार -माळ बनवणा:यांना अनेक वेळा खांद्याचा त्रास होतो.
शेतकरी, छोटे व्यापारी, कारखानदार, अगदी बॅंकेत बसून काम करणारे कर्मचारी सुद्धा या वेदनांनी अडकून पडलेत. जास्त वेळ बसून राहणे ही कंबरदुखी व माकड हाड दुखी करते 
कॅन्सर असलेल्या रुग्णांमध्ये तर वेदना असह्य असतात. अशांना जर निदान चांगली झोप, उठणं-बसणं थोडं सुखकारक झालं तरच ते उर्वरित आयुष्य थोडं सुसह्य करता येतं. त्यांच्या वेदना बघून त्यांचे नातेवाईक ही हतबल होतात. वेळेवरच जर पेन डॉक्टर कडे गेले तर योग्य वेळी मानेत, पोटात, पाठीत काही इंजेक्शन देऊन वेदना ना आटोक्यात आणता येते. ह्याने पुढे मोठ्याप्रमाणत दुखण्याचे शक्यता कमी होते.
पण दुर्दैवाने, आपल्या लोकांना अजूनही 'वेदना तज्ज्ञÓ म्हणजं काय हे पुरेसं माहीत नाही.
जसं गर्भाशयाचं काही झालं तर आपण स्त्रीरोगतज्ज्ञाकडेच जातो, हाड मोडलं की ऑर्थोपेडिककडेच जातो — तसंच कोणत्याही प्रकारच्या वेदना असतील, त्या फक्त गोळ्या घेत राहण्याएवजी आता आपल्या शहरात वेदनांच्या तज्ज्ञांकडे जाऊन आधुनिक पद्धतीने तपासता आणि कमी करता येतात.
हे काही जादू नाही. विज्ञानानं एवढी प्रगती केलीय की आपण वेदना प्रकट करणा:या नसांना बधिर करुन वेदना  कमी करू शकतो, रोजच्या जगण्याची गुणवत्ता सुधारू शकतो. 
म्हणूनच बाधिरीकरण तज्ञांचे सूपर स्पेशलाइसेशन चा एक विषय आहे 'पेन मैनेजमेंटÓ आणि सगळ्यात महत्त्वाचं — हे वेळीच केलं तर पुढे मोठे दुखणे टाळता येतात आणि कामाला रुजू होता येत, तर तुमच्या घरात कुणी सतत मान, पाठी, गुडघे, खांदे धरून बसतंय का? कुणाचं ऑपरेशन झालं तरी अजून दुखतंय का? कुणाला कॅन्सरमुळे असह्य वेदना आहेत का? मग तुम्ही हे लक्षात ठेवा — आता आपल्या अकोल्यात फक्त वेदनेवरच खास लक्ष देणारी पेन स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, डॉ नम्रता नरेंद्र भागवत.
वेळेत समजून घ्या, उपाय करा, आणि पुन्हा मोकळेपणे, हसत-हसत जगा.
-------------------------------------------------------------------------------

पेन मॅनेजमेंट : एक वैज्ञानिक आणि संवेदनशील दृष्टिकोन...


कॅन्सर म्हणजे केवळ शारीरिक आजार नाही, तर तो एक भावनिक, मानसिक आणि सामाजिक लढाही असतो. या लढ्याचा एक महत्त्वाचा आणि अनेक वेळा दुर्लक्षित पैलू म्हणजे कॅन्सरशी संबंधित वेदना — ज्याला वैद्यकीय भाषेत कॅन्सर पेन म्हणतात. अशा वेदनांचे व्यवस्थापन  रुग्णाच्या जीवनमानात सुधारणा घडवू शकते आणि उपचारप्रक्रियेला अधिक परिणामकारक बनवू शकते.
 कॅन्सर पेन वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होतो. तो हाडांमध्ये असू शकतो   नसांमध्ये  , किंवा ट्युमरद्वारे जवळच्या अवयवांवर दाब आल्यामुळे होणारा असतो. काही वेळा केमोथेरपी, रेडिएशन किंवा सर्जरीनंतरही वेदना राहू शकतात. त्यामुळे कॅन्सर पेन केवळ ट्युमरमुळेच होतो, असे नाही.
 कॅन्सर पेन केवळ रुग्णाचे शारीरिक हाल वाढवत नाही, तर त्याच्या मनोबलावरही परिणाम करतो. अनेकदा रुग्ण नैराश्य, चिंता आणि झोपेच्या समस्या अनुभवतात. म्हणूनच वेदना कमी करणे ही केवळ सहानुभूती नव्हे, तर उपचारच आहे. योग्य पेन मॅनेजमेंटमुळे रुग्णास दैनंदिन कृती, सामाजिक संवाद आणि मन:शांती अनुभवता येते.
कॅन्सर पेन मॅनेजमेंट करताना रुग्णाचा आवाज महत्त्वाचा आहे. त्याच्या वेदनेचे प्रमाण, स्वरूप आणि परिणाम हे सर्व समजून घेतले पाहिजे. कुटुंब, डॉक्टर, नर्स आणि पेन स्पेशालिस्ट यांच्यात समन्वय असणे गरजेचे असते.  कॅन्सरच्या लढाईत वेदनांविरुद्धची झुंज अत्यंत महत्त्वाची आहे.  वेदना टाळता येत नाहीत  ही समजूत आता मागे पडली आहे. योग्य उपचार, आधुनिक वैद्यकीय प्रणाली, आणि सहानुभूतीपूर्ण सेवा यामुळे कॅन्सर रुग्णांना दर्जेदार, वेदनामुक्त आणि सन्मानपूर्वक जीवन जगता येते. कॅन्सर पेन मॅनेजमेंट ही केवळ उपचाराची शाखा नाही, ती एक मानवी संवेदना आहे — रुग्णाच्या व्यथेवर फुं कर घालणारी, आशेचा किरण देणारी. 
वेदना... या तीन अक्षरांमध्ये माणसाच्या जगण्यातला सर्वांत कठीण काळ सामावलेला असतो. विशेषत: कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी वेदना ही केवळ शारीरिक नसते, ती मानसिक, सामाजिक आणि कधी-कधी आध्यात्मिक देखील असते. अशा वेळी एखादी व्यक्ती केवळ डॉक्टर म्हणून नव्हे, तर एक सहवेदना जाणणारा माणूस म्हणून समोर उभी राहते, तर त्या रुग्णासाठी ती ईश्वरतुल्य ठरते. अकोल्यामधील वत्सल हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. नम्रता नरेंद्र भागवत हेच असं व्यक्तिमत्व आहे.
 आरोग्यशास्त्रामध्ये 'पेन मॅनेजमेंटÓ हा एक तुलनेने कमी लक्ष दिला गेलेला विभाग आहे. डॉक्टरांचे लक्ष बहुतांश वेळा आजार बरा करण्याकडे असते; पण काही रोग असे असतात की आजाराचे उपचार सुरू असले/संपले तरी वेदना सुरुच असतात. अशा रुग्णांसाठी 'वेदनांचाÓ उपचार हाच मोठा आधार असतो.
'पेन मॅनेजमेंटÓ ही एक विशिष्ट शाखा असून त्यामध्ये केवळ औषधोपचार नव्हे, तर मानसशास्त्र, न्यूरोलॉजी, अॅनेस्थेसिया आणि समुपदेशन यांचा समावेश असतो. यातून रुग्णाची शारीरिक वेदना कमी करणे, मन:स्वास्थ्य सुधारवणे आणि  जगण्याला सन्मानाने सामोरे जाण्यास मदत करणे  हे सर्व प्रयत्न केले जातात. या अत्यंत संवेदनशील, भावनिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून कौशल्य आणि मायेने काम करणा:या डॉक्टर नम्रता नरेंद्र भागवत या या क्षेत्रातील अग्रणी नाव आहेत. डॉ. नम्रता एन. भागवत यांचे शिक्षण अत्यंत सखोल असून त्यांनी अॅनेस्थेसियात उच्च शिक्षण घेतले आहे. मात्र, केवळ ऑपरेशन थिएटरमध्ये मर्यादित न राहता त्यांनी पेन मॅनेजमेंट क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवले. त्यांच्या दृष्टीने रुग्ण हा केवळ उपचारासाठी आलेला 'केसÓ नसून एक भावनांनी भरलेला, व्यथा झेलणारा जीव आहे. कॅन्सरच्या विविध टप्प्यांतील वेदना, केमोथेरपीचे परिणाम, मज्जासंस्थेवरील ताण, स्नायूंची झीज,  यावर तंत्रशुद्ध पद्धतींनी त्या उपचार करतात.  याठिकाणी डॉ. नम्रता एन. भागवत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
 रुग्णांना वेळेवर आणि योग्य औषधोपचार मिळणे, वेदना नियंत्रणासाठी 'नर्व ब्लॉकÓ, 'इन्फ्युजन पंपÓ, 'इंट्राथेकल ड्रग डिलीवरी सिस्टमÓ यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना समुपदेशन, हे सर्व त्या तितक्याच समर्पणाने करतात. वेदना शून्य करणे म्हणजे उपचार नव्हे, ती सेवा आहे...  असं डॉक्टर नम्रता नरेंद्र भागवत वारंवार सांगतात. यामध्ये त्यांच्या कार्याचा गाभा आहे,  शाश्वत सेवा, सहवेदना आणि समर्पण भावना आहे.

Post a Comment

0 Comments