अकोला (प्रतिनिधी) :"एकल महिलांना केवळ मदत न देता त्यांना उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणे हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे," असे प्रतिपादन एकल महिला पुनर्वसन समितीचे प्रणेते, ज्येष्ठ समाजसेवक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी केले.
स्नेहाश्रय व्यसनमुक्ती, समुपदेशन आणि पुनर्वसन केंद्र, एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशन अकोला तथा सेवाधर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अकोला यांच्या वतीने आयोजित विशेष मार्गदर्शनपर सभेत ते बोलत होते. सदर कार्यक्रम मलकापूर येथील केंद्रात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते जयप्रकाश मुरूमकर होते, तर प्रमुख वक्ते म्हणून समाज सुधारक हेरंब कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद भोवर, ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, सुनील वनारे, प्रा. संदीप भोवते, राजेश टाले , एडवोकेट सविता खोटरे, ॲड जितेंद्र बगाटे, समाधान वानखडे ,शिवराज पाटील, जयदीप सोनखासकर, विजय कुलकर्णी,आदींचा समावेश होता.
सभेत मार्गदर्शन करताना हेरंब कुलकर्णी म्हणाले की, "समाजातील एकल महिलांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आधार देण्याची आवश्यकता आहे. मात्र केवळ आधार देऊन उपयोग नाही, त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ मिळाले तरच त्या खऱ्या अर्थाने सक्षम होतील आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतील."
या वेळी अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, एकल महिला, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ॲड प्रांजली जयस्वाल तर आभार संस्थेचे अध्यक्ष महेंद्र गणोदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजसेवक गजानन हरणे , तुषार हांडे, ॲड. प्रांजली जयस्वाल, महेंद्र गणोदे , शंकर वाघमारे, विशाल गजभिये, वर्षा कान्हेड, शीला देशमुख, शोभा समरीतकर, अनिता काळबांडे, निशा ग्यारल, ममता जरपोतदार, स्वप्न गजभिये, पल्लवी ठाकरे, नयना खिल्लारे, रूपाली भड,किरण अवचार, सुनील लाडुलकर,आदींनी मोलाचे परिश्रम घेऊन योगदान दिल.
0 Comments