Ticker

6/recent/ticker-posts

जल जीवन मिशन अंतर्गत पाईप लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे

 


चिखलदरा तालुका प्रतिनिधी-नितीन वरखडे

जल जीवन मिशनचा उद्देश राज्यांच्या त्या ग्रामीण भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहे, अनेक ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही आणि लोकांना पाणी आणण्यासाठी अनेक अंतर पायी जावे लागते. पण जल जीवन मिशनचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. घरोघरी पाणी देण्याच्या योजनेवरून गदारोड झाला आहे. निकृष्ट दर्जाचे पाईप टाकण्यात आल्याचा आरोप सरपंच सचिव यांनी केला आहे. *हर घर नल से जल* योजनेवरून गदारोड झाला आहे. हे पाईप स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे टाकण्यात आल्याचा आरोप सरपंच व सचिव यांनी केला. त्याचबरोबर प्लास्टो पाईप ऐवजी स्वस्त कंपनीचे पाईप गावात टाकण्यात आले आहेत. ते सहज पणे तुटत आहे. व इतर कारणांमुळे त्याचे नुकसान होऊ शकते. गावकऱ्यांनी म्हटले प्रमाणे सरपंच व सचिव यांनी गांगरखेडाची पाहणी केली असता, इथे जल जीवन मिशनचे पाईप लाईनच्या काम एकदम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. हर घर नल से जल योजने अंतर्गत गांगरखेडा येथील पाईप लाईनचे काम सुरू आहे. येथील गावकऱ्यांचा व ग्रामपंचायततील पदाधिकारी यांचाशी बोलताना असा लक्षत आला की, येथे जी जल जीवन मिशन योजना अंतर्गत जी पाईप लाईन टाकण्यात येत आहे ,ती अंत्यत निकृष्ट दर्जाचे आहे. किंवा पाईपचा दर्जा अत्यंत खालावल्याचा असा गावकऱ्यांचा मत आहे. 



या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी गावकऱ्यांनी प्रशासना कडून केली आहे. व महाग ऐवजी स्वस्त पाईपची ही किंमत जास्त सांगण्यात आल्याचं आरोपही केला जात आहे. प्रत्येक घरातील नळपाणी योजनेतील पाईपचा दर्जा निकृष्ट आहे. गांगरखेडा येथे कामाची चौकशी झाली पाहिजे. सरकारी अर्थसंकल्पाचा कसा दुरुपयोग होत आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली जाईल, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments