जानेफल : रासायनिक व हानिकारक कीटक नाशकाच्या अतिरिक्त वापरामुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील कुटुंबियांचे आरोग्य खालावत आहे, यावर उपाय म्हणून सेंद्रीय शेती करणे गरजेचे आहे. असे मत नवभारत फर्टिलायझर चे अधिकारी गणेश निकस यांनी व्यक्त केले.ते बुधवारी सिंदखेड राजा तालुक्यातील गुंज येथील आदर्श शेतकरी श्री.मदन भाऊ तुपकर यांच्या भेंडी या पिकाची पाहणी करत असताना बोलले.
तेंव्हा शेतकरी मदन भाऊ तुपकर यांनी सांगितले की ते मागील तीन ते चार वर्षापासून नवभारत फर्टिलायझर चे अधिकारी श्री.गणेश सातपुते याच्या मार्गदर्शनामुळे जैविक शेती करत आहे आणि जैविक शेती मधून मला बराचसा फायदा होत आहे असे ते म्हणाले. व इतर शेतकऱ्यांनी ही रासायनिक सोडून जैविक पद्धतीने शेती करावी असेही ते म्हणाले.



0 Comments