Ticker

6/recent/ticker-posts

महाभारताची साक्ष सांगणारा वायगाव चा सिद्धिविनायक गणपती

 


महाभारतातील पांडवांनी याच मूर्तीच्या दर्शनानंतर वनवास संपविला


संतोष शेंडे (टाकरखेडा संभू)

महाभारतातील इतिहासाची साक्ष देणारे  भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र वायगाव येथे येथील उजव्या सोंडेची अद्भुत गणेश मुर्ती पहावयास मिळेल. महाभारतातील पांडव अज्ञातवासात असताना  ते चिखलदरा येथे आले होते परतीच्या वेळेस याच मूर्तीचे दर्शन घेऊन पांडवांनी आपला अज्ञातवास संपविला अशी आख्यायिका आहे.  अशा या ऐतिहासिक सहाशे वर्षा पूर्वी खोदकामात सापडलेलि गणेश मुर्ती महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या मनात बसली आहे .

महाराष्ट्रात दोनच ठिकाणी सिद्धिविनायकाची ही मूर्ती पाहावयास मिळेल मुंबई नंतर अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील वायगाव येथे, ही दिव्य सुंदर मूर्ती आहे., या सिद्धीविनायकाच्या मूर्तीचा इतिहास पाहता  जुन्या लोकांच्या सांगण्यावरून महाभारतातील विराट पर्वापर्यंत मूर्तीची आख्यायिका ऐकन्यात मिळते,तेव्हा पांडव अज्ञातवासात असताना विराट कडे होते तेव्हा याच मूर्तीच्या दर्शनाने त्यांच्या अज्ञातवासातील  वनवासी जीवन संपले. ही मूर्ती मध्यावर्ती मुघल काळात भूमिगत ठेवण्यात आली होती, या गावाच्या  सभोवताल असलेले अचलपूर, दारापुर ,खोलापूर ही गावे मुघलांच्या ताब्यात होती, त्यानंतर सहाशे वर्षाच्या अंदाजे काळ गेला त्यामुळे मूर्तीचा अचूक ठावठीकाणा लागला नव्हता, लोकांना साक्षात्कार व्हायचा ,पण मूर्ती सापडत नव्हती ,आणि अचानक खोदकामात ही मूर्ती वागावय येथे  इंगोले यांच्या घरी सापडली, तो काळ सोळाव्या शतकातला होता ,तेव्हापासून मूर्ती वाडा रुपी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली व मूर्तीचा पूर्वापार इंगोले कुटुंबात असलेली सेवा पुन्हा सुरू झाली ,ही आजही कायम आहे गणेश मूर्ती बद्दल ऐकताच महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त वायगाव च्या वाटेवर येऊ लागले, कालांतराने गणेशभक्तांची गर्दी वाढत असल्यामुळे इंगोले परिवाराच्यावतीने भक्तांच्या सुविधांसाठी ट्रस्टची स्थापना केली ,त्यानंतर येथे मंदिर बांधण्यात आले त्यासाठी इंगोले कुटुंबातील लोकांनी शेती देऊन या मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण केले ,याचे व्यवस्थापन  लालजी पाटील ,सितारामजी पाटील, तुळशीराम पाटील, शिवराम पाटील ,तुकारामजी पाटील ,श्रीराम पाटील व दयाराम पाटील यांच्याकडे आहे ट्रस्टची धुरा सध्या अध्यक्ष या नात्याने विलासराव तुकाराम इंगोले यांच्याकडे आहे ,या ट्रस्टच्या वतीने वर्षातून दोनदा येथे मोठे उत्सव साजरे केले जातात, भाद्रपद शुक्ल४ते पौर्णिमेपर्यंत गणेश उत्सवात दररोज दहा दिवस भक्तांना अन्नदान, ज्ञानदान ,भजन कीर्तन, काकडा, हरिपाठ, पौर्णिमेच्या टाळ मृदुंग व घोषात ऐश्वर्य युक्त तिच्या पार्थिव मूर्तीचे विसर्जन होते, त्यानंतर महाप्रसाद होतो गणेशजयंती उत्सवात महाराष्ट्रातील हजारो भक्त येथे दाखल होतात, तसेच प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांची मांदियाळी येथे दिसून येते ,मुंबई-पुणे मध्य प्रदेश सह संपूर्ण महाराष्ट्रातून दूरवरचे भक्त येथे येऊन अभिषेक  नवस पुरवितात.

 ऐतिहासिक महाभारतात उल्लेख असलेल्या या अद्भुत मूर्तीचे दर्शन करण्याचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या  विश्वस्त मंडळाने केले आहे 


सिद्धिविनायक मूर्तीचे वैशिष्ट 

सिद्धिविनायक संपूर्ण महाराष्ट्रात सुंदर मूर्ती आहे की उजव्या सोंडेची असून उजव्या बाजूला सिद्धी व डाव्या बाजूला रिद्धी आहे, एकदंत पायावर पदम, शंख चिन्हांकित आहे ,षड ऐश्वर्याचे प्रतीक आहे त्याचे दर्शन ज्याना झाले,  त्यांना कधीच कमी पडत नाही, हातातील माळ व मोदक ऐकीक जीवनातील समृद्धीचा संकेत देतात. उत्तरायण दक्षिणायन होताना  सूर्योदयाची पहिली किरण मूर्तीवर पड़ते .

Post a Comment

0 Comments