Ticker

6/recent/ticker-posts

भ्रष्टाचार वनअधिकाऱ्याचा आणि फसवणूक न्यायालयाची !

पुसद : वनविभाग पुसद मधील मारवाडी वन परीक्षेत्रातील लाखी बीटात कक्ष क्र. ३७८ मध्ये विना परवानगीने राखीव वनजमीनीवर खोदकाम केल्याने वनसंवर्धन अधिनियम १९८० चे उल्लंघन झाले असताना वनअधिकारी शासकीय अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्ट मार्गाने ठेकेदाराशी संगनमत करून सोयीचे वनगुन्हा दाखल करून पुसद वनविभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक श्री. अरविंद मुंढे तसेच सहा. वनसंरक्षक श्री. बी. के. करे यांनी भ्रष्टाचार करून थातूरमातूर भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१) चा भंग झाल्याचे चुकीचे दाखवून आणि दि. १२/०७/२०१७ ते दि. २४/०७/२०१७ दरम्यान विनापरवानगीने झालेले २४७५ रनिंग मिटर खोदकाम दि. २४/०७/२०१७ चे संध्याकाळी ०६:०० ते २५/०७/२०१७ सकाळी ०६:०० वाजेपर्यंत झाल्याचे दाखवून आरोपीला अटक न करता वनअधिकाऱ्यानी ठेकेदाराशी आर्थिक मोबदल्यात थातूरमातूर प्रा. गु. २०१७-१५२-०५ दि. २५/०७/२०१७ रोजी ८० पालव्या तुटल्यामुळे वनगुन्हा रिपोर्ट जारी करण्यात आला.

 पाहू जाता सागवानाची आणि आडजातीची मोठमोठी झाडे तुटली असताना सहाय्यक वनसंरक्षक वनविभाग पुसद यांनी मा. न्यायालयाची फसवणूक करून चुकीचा वनगुन्हा नोंदवून दि. २६/०९/२०१७ रोजी प्रकरण प्रथम श्रेणी सत्र न्यायालय पुसद यांचे कोर्‌टात केस दाखल केली परंतु दि. १४/०७/२०१७ रोजी तत्कालीन उपवनसंरक्षक श्री. अरविंद मुंढे हे मोकास्थळी जाऊन वनपरीक्षेञ अधिकारी तसेच वनपाल, वनरक्षक यांना दम भरून बंद केलेले खोदकाम परवानगी मिळेल म्हणून खोदकाम थांबवू नये असे तोंडी आदेश दिले.

 तसे बयान दि. २१/०९/२०१७ च्या चौकशी अहवालात वनपाल आणि वनरक्षक यांनी दिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे वनअधिकारी सहाय्यक वनसंरक्षक श्री. बी. के. करे यांनी कनिष्ठ कर्मचारीवर दबाव टाकून चुकीचे बयान नोंदविन्यास भाग पाडले, पाहू जाता वनसंवर्धन अधिनियम १९८० चा भंग झाल्यामुळे दोन जेसीबी सह एक पोकलेन मशिन जप्त करणे महत्त्वाचे होते परंतु तसे न करता वरिष्ठांचे आदेशानुसार सदर मशिन विकून सर्व रक्कम शासकीय खजान्यात जमा करावे असे आदेश मुख्य वनसंरक्षक यवतमाळ यांनी दिले असता सहाय्यक वनसंरक्षक श्री. बी. के. करे यांनी वरिष्ठाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून ठेकेदाराशी संगनमत करून तीनही मशिन ताब्यात न घेता आणि मा. न्यायालयाचा मशिन सोडण्याचा कोणताही आदेश नसताना सहाय्यक वनसंरक्षक श्री. बी. के. करे यांनी मा. न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता तीनही मशिन ठेकेदाराच्या ताब्यात दिली आणि भ्रष्टाचार करून पुसद वनविभागाच्या वनअधिकाऱ्यानी मा. न्यायालयाची फसवणूक करून चुकीचा वनगुन्हा दाखल करून ठेकेदाराला सोयीचे होईल असे कलम लावून मा. न्यायालयाची दिशाभूल केली या फसवणूक प्रकरणी मा. न्यायालयाने योग्य प्रकारे चौकशी तथा कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments