Ticker

6/recent/ticker-posts

तुम्हाला माहिती आहे का करोडपती लोकांचे गाव



या जगात प्रत्येकाला श्रीमंत व्हावं असं वाटत असतं. आपली गरिबी दूर व्हावी, आपणही श्रीमंत व्हावं असा विचार अनेकांच्या मनात येतो, पण प्रत्येकाला यश मिळतं असं नाही. म्हणूनच आजही समाजात श्रीमंत-गरीब हा भेदाभेद दिसून येतोच.


मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये काही भाग हा जरी उच्चभ्रू सोसायटी, बंगल्यांनी व्यापलेला असला, तरी देखील तेथील काही भाग हा अजूनही चाळींनी भरलेला आहे, हे विसरता येणार नाही.


आपल्या देशातील गावाचा विचार केला तर आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं ते हिरवगार शेत, फुलांनी, हिरव्या झाडांनी बहरलेला परिसर, कौलारू घरे, शेणाचा सडा घातलेली आंगणं आणि गावातील साधी राहणी असलेली शेतकरी माणसं. आता हळूहळू गावांचं स्वरूप जरी बदलत असलं तरी तेथील जास्तीत जास्त माणसं ही साधारण कुटूंबातील असतात. जीथे गरीब-श्रीमंत असा वर्ग दिसून येतो.


परंतू आपल्या देशात असे एक गाव आहे, जे शहरापेक्षा देखील फार मोठे आहे म्हणजेच श्रीमंत आहे. या गावाला करोडपतींच गाव म्हणून देखील ओळखल्या जाते. कारण येथे राहणारा प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत आहे. 



गुजरातमधील कच्छ परिसरात असलेले बल्दिया गाव. या गावातील लोकांची समृद्धी बघून सर्वांचे डोळे भरून येईल, हे मात्र नक्की. मोठ्या शहरांमध्ये ज्या सुविधा उपलब्ध असतात, त्या संपूर्ण सुविधा या गावात उपलब्ध आहेत. 


या गावातील लोकांच्या बँक अकाउंट्समध्ये मागील दोन वर्षात तब्बल दीड हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर येथील डाक घरात 500 कोटी पेक्षा जास्त रुपये जमा असल्याचेही सांगितले जात आहे.


गुजरात मधील अशी अनेक गावे आहेत, जी बल्दिया प्रमाणे समृद्ध आहेत. त्यात माधापूर या गावाचा देखील समावेश होतो. या गावात नऊ बँकांच्या शाखा असून, अनेक एटीएम गावांमध्ये लावण्यात आले आहे. या गावातील बहुतांश लोक हे पटेल समाजातील असल्याचेही सांगितले जात आहे.


माधापूर गाव चे प्रमुख सांगतात की, 

आर्थिक रुपाने समृद्ध असलेल्या या गावातील बहुतांश कुटुंब, हे विदेशात राहतात. त्यांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते या गावात परत येतात. या गावात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये वृद्धांची संख्या ही जास्त आहे. कारण बहुतांश तरुण हे परदेशात नोकरी करतात. परंतू येथील अनेक लोक हे विदेशात वास्तव्य केल्यानंतर आपल्या गावात परत येतात. 


एका माहितीनुसार, या गावातील लोक गेल्या शंभर वर्षापूर्वी विदेशात पैसे कमविण्याच्या हेतूने गेले होते. ते लोक व्यवसायात समृद्ध झाल्याने, विदेशातून परत आल्यावर त्यांनी आपल्या मायदेशी राहण्याचा निर्णय घेतला.

Post a Comment

0 Comments