Ticker

6/recent/ticker-posts

मायलेकींनी सोडला प्राण, लग्नाची खरेदी करतांना झाली होती कोरोनाची लागण



जयपूर | देशात कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त केले आहे. कोरोना रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. अनेकांनी आपल्या प्रियजनांना कोरोनामुळे गमावलं आहे. अशाच एक हृदयद्रावक घटनेने एका कुटूंबातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. जीथे अवघ्या 12 तासात आई आणि मुलीचा कोरोनाने बळी घेतला आहे.  संगीता असं मुलीचं तर बद्रीबाई असं तीच्या आईचं नाव आहे. 


बी.टेक झालेल्या संगीताचा काही महिन्यांनी लग्न होणार होते. कोरोनाची भिषण परिस्थिती लक्षात घेता हा विवाह नोव्हेंबर महिन्यात करण्याचे ठरले. त्यामुळे संपूर्ण कुटूंब तिच्या लग्नाची तयारी करत होतं. 


यादरम्यान संगीताच्या आई बद्रीबाई लग्नाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. बाहेरून परत आल्यावर मात्र त्या अचानक आजारी पडल्या. त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. मुलगी संगीताची प्रकृती खालावल्याने तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


जवळपास 12 दिवस या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतू प्रकृती गंभीर झाल्याने दोघींनीही एका पाठोपाठ प्राण सोडले.

Post a Comment

0 Comments