Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिरचे 10 वी परिक्षेत 100 % यश

 


बुलडाणा स्थानिक सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथील निवासी व अनिवासी शाळेच्या इ .10 वी च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा 100 % निकालाची परंपरा कायम राखली . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार विद्या मंदिर परिपुर्ण प्रयत्न करीत असून 10 वी च्या सर्व विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत असुन , विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत यश प्राप्त केले . यामध्ये चि.आर्यन मुंडे 9860 % चि.शिवम लंवगे 97.60 % कु . स्वराली नरवाडे 96,00 % चि . हेमंत मुंदडा 95.40 % कु . प्राची ज्ञाने 9520 % चि . अमेय खंडेलवाल 9420 % कु . ऋतुजा सपकाळ 94.00 % चि . अखिलेश कोंबे 93.60 % चि . अभिषेक मोरे 93.60 % चि . अथर्व जांगीड 93.00 % चि . गोपाल उबरहंडे 93.00 % , कु . श्रेया नलमवार 93.00 % गुण प्राप्त केले . गुणवत्ता श्रेणीमध्ये शाळेचे 136 विद्यार्थी असून 90 % वरती 39 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्यामजी चांडक , संस्थेच्या अध्यक्षा सौ . कोमलताई झंवर , संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ . सुकेशजी झंवर , प्राचार्य व शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

0 Comments