Ticker

6/recent/ticker-posts

सुरू कार्यक्रमात अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका

From Facebook


अकोला | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदर अमोल मिटकरी हे रविवारी हिंगणा येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत असतांना अचानक त्यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. 


हे बघून तेथील सर्वांनाच धक्का बसला. प्रसंगावधान राखत तात्काळ मिटकरी यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य कला चित्रपट विभागाच्या विदर्भ अध्यक्षा महागायिका वैशाली माडे काल अकोला दौऱ्यावर होत्या. पक्षाच्या वतीने वैशाली माडे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 


या कार्यक्रमाला अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर काही नेते देखील उपस्थित होते. अमोल मिटकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली’ ही छक्कड गायला सुरुवात केली. 


मात्र, काही क्षणातंच त्यांच्या आवजामध्ये बदल होऊन प्रकृती ढासळत असल्याचे तेथील उपस्थितांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने मिटकरी यांना आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले.


आता आपली प्रकृती बरी असून, कोणीही आपले जीव धोक्यात घालून भेटायला येवू नये, अशी विनंती अमोल मिटकरी यांनी जनहितार्थ केली आहे.

Post a Comment

0 Comments