Ticker

6/recent/ticker-posts

लोणी काळे येथे स्मशानभूमीचे उद्घाटन



मेहकर-तालुक्यातील लोणी काळे या गावात जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा ताई पवार काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष श्री देवानंद पवार यांच्या संकल्पनेतून लोणी काळे या गावाला स्मशानभूमी शेड मंजूर करून कामाला सुरुवात केली आहे मेहकर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजून स्मशानभूमी शेड नाही त्यामुळे गावातून कोणी एखादा व्यक्ती मृत झाला तर गावकऱ्यांच्या हाल होत आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठे शेतात मूठमाती त्याचे प्रेताची विल्हेवाट लावली जाते पण पावसाळा दिवसांमध्ये अतिशय संकटाचा सामना करावा लागतो असे जगावे हे एक जिवंत उदाहरण सात आठ महिन्यापूर्वी एका प्रेताची विल्हेवाट बाहेरगावी नेऊन लावायचे काम पडले होते इतक्या गंभीर परिस्थितीतही लोक अजून वावरतात लोकप्रतिनिधी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात अशातच देवानंद पवार सरसावले आणि लोणी काळे या गावाला स्मशानभूमीचे शेड बांधून दिले पोटाची खळगी भरण्यासाठी पूर्ण आयुष्य काबाड कष्ट करावे लागतात जिवंतपणी सुख भेटत नाही तर मी मृत्यू झाल्यानंतर यांच्या मृत्यूच्या प्रेताची अवहेलन होवू नाही त्या प्रेताची मानसन्मानाने विल्हेवाट लागली पाहिजेत त्यासाठी गावोगावी स्थानिक स्मशानभूमी असायला पाहिजेत लोणी काळे या गावची दुर्दशा बऱ्यापैकी होती पण आता कायमस्वरूपी सेट झाल्यामुळे प्रेताची विल्हेवाट गावातच लावल्या जाईल त्यामुळे गावकरी सर्व सहकार्य करीत आहे सर्व मिळून लोकवर्गणी करून दोन गुंठे जमीन विकत घेऊन त्यामध्ये शेडचे बांधकाम देवानंद पवार यांनी करून दिले त्याबद्दल गावात देवानंद पवार यांचे कौतुक होत आहे उद्घाटन करते वेळी गावातील मान्यवर सरपंच विलास आलाट नामदेव राठोड महादेव वाघ भीमराव मुळे वामन आखूड नामदेव काळे विष्णू वाघ दीपक ढोरे दिलीप भांडेकर विजू जवंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments