Ticker

6/recent/ticker-posts

तायकोन्डो खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले

निदा इंटरनॅशनल

निदा इंटरनॅशनल स्कूलचा अब्दुल साद ठरला विजेता मानकरी


अमरावती- शिवाजी बीपीएड कॉलेजच्या प्रांगणातून निदा इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी जिल्हा स्तरीय तायकोन्डो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अब्दुल साद अब्दुल शाहीद असे सुवर्णपदक पटकाविणाऱ्या विध्यार्थ्याचे नांव आहे.

निदा इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी अब्दुल साद याचे प्रशिक्षण शाळेच्या माध्यमातून मागील 2 वर्षापासून सुरु होते. कोरोना काळात म्हणजेच लॉकडाऊन कठीण परिस्थितीच्या दिवसात तायकोन्डो खेळाचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरूच होते. निदा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका हीना नवेद हुसेन यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात मोठा सहभाग होता.
 जिल्हा स्तरीय तायकोन्डो स्पर्धा 3 फेरीत पार पडली. प्रत्येक एक फेरी 2- मिनिटाची होती. अशाच अब्दुल साद या विद्यार्थ्याने 3 फेरीत विजय मिळवून शाळेसोबतच आपल्या नावावर सुवर्णपदकाचा ठसा उमटविला. अब्दुल साद याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments