Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा कार्यकर्ता नितीन मोरे यांचा पत्रकारावर हल्ला

 


व्हाईस ऑफ मिडीया (सा.विंगचे) जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांना नितीन मोरेकडून मारहाण

अकोला : न्यु महसुल कॉलनीतील प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष व साप्ता. नारी ललकारचे संपादक अधिस्वीकृतीधारक ़ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव वर यांच्यावर येथील गुंड प्रवृत्तीच्या नितीन किसन मोरे यांनी रविवार दि. २१ एप्रिल २०२४ च्या रात्री ९ वाजता हल्ला केला आहे. सविस्तर वृत्त असे की, न्यु महसुल कॉलनीतील हनुमान मंदिराचे प्रांगणात प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची कॉर्नर मिटींगचे आयोजन तेथील कार्यकत्र्यांना विचार विमर्श करून केले होते. त्या संदर्भात पत्रकार या नात्याने माहिती घेण्यास पंजाबराव वर गेले असता येथेच राहत असलेले पुर्वीचे सेनेचा कार्यकर्ता म्हणविणारा व सध्या भाजपात असलेला नितीन मोरे म्हणाला की, ‘‘येथे वंचितची, व काँग्रेसची कोणतीही कॉर्नर मिटींग होऊ देणार नाही’’ मिटींग झाल्यास वाईट परिणाम होतील, असे धमकावले, शासकीय  जागेत कोणत्याही पक्षाला मिटींग घेण्याचा लोकशाहीने अधिकार दिलेला असतांना नितीन मोरे आपलीच मालमत्ता समजून मग्रुरीने दारूच्या तर्रर्र नशेत असल्याने लोकशाही पायदळी तुडवित बोलत होता व पत्रकार पंजाबराव वर यांना अश्लील शिवीगाळ करून  त्यांना बुक्याने मारहाण केली व जिवाने मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्यावेळी त्यांचे सोबत सामाजिक कार्यकर्ते सुभाष वानखडे होते. आजूबाजूचे लोकांनी येवून नितीन मोरेला आवरले, नाहीतर अनर्थ घडला असता़ याबाबतची तक्रार पो.स्टे. खदान अकोला येथे देऊन गुंड प्रवृत्तीच्या नितीन मोरे याच्यावर भा.दं.वि.चे कलम ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे, नुकताच महाराष्ट्र शासनाने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला आहे, पत्रकारावर हल्ला करणाNया नितीन मोरेवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे जिथे पत्रकारही सुरक्षीत नाही तेथे सामान्य जनतेचे काय? असा सवाल पत्रकार करीत आहेत. लोकसभेची आचारसंहिता लागू असतांना परिसरात दहशतीचे वातावरण पसरविणाNया, दादागिरी करणाNया नितीन मोरेच्या मुसक्या आवराव्या अशी पत्रकार बांधवांची मागणी आहे. विविध स्तरातून सदरहू घटनेचा निषेध नोंदविला जात आहे.

Post a Comment

0 Comments