Ticker

6/recent/ticker-posts

मतदानाची टक्केवारी घसरली, शेकडो मतदार मतदानापासून वंचित, निवडणूक विभागावर ठपका ?



बुलढाणा लोकसभा निवडणुकीत निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी व निवडणूक आयोगाने जनजागृती केली.त्यासाठी लोखो रुपये खर्च केले. मतदार मतदान केंद्रावर गेला. मतदान कार्ड व आधार कार्ड दाखविले.

मतदान अधिकारी म्हणतो तुमचे नाव माझ्या यादीत नाही. यादीत नांव आहे, पण त्यावर डिलीट चा शिक्का आहे. त्यामुळे मतदान करता येत नाही. बाहेर जावे.

असे सांगून चक्क परत पाठविले.

यादीत नांव असुनही मतदान करता आले नाही.


गत बावीस वर्षांपासून झालेल्या प्रत्येक निवडणूकीत मतदान केले.

पण आज मतदान करता आले नाही.

निवडणूक विभागाच्या या बहुचर्चित गोंधळा बाबत शेकडो वंछीत मतदारांनी भर उन्हात पायपीट करून निवडणूक अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून मदत मागितली. पण साँरी काही करु शकत नाही म्हणून मतदारांची घोर निराशाच केली. परिणामी मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर घसरली.


आयोगाची जाहिरातबाजी चर्चेचा विषय


मतदान जागृती साठी निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणावर जाहिरात बाजी केली. रँली काढल्या. त्यावर प्रचंड खर्च केला. तो निव्वळ व्यर्थ गेला. अशी संतप्त प्रतिक्रिया मतदानापासून वंचित राहिलेला मतदार राजांनी  व्यक्त  केल्या।

Post a Comment

0 Comments