Ticker

6/recent/ticker-posts

३ कोटी ७२ लक्ष रुपयांच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे भूमिपूजन

mla devendra bhuyar amravati


मोर्शी वरुड- मोर्शी वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मोर्शी वरुड तालुक्यातील सिंचन प्रकल्प व सिंचनाशी संबंधित समस्या पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून मोर्शी वरुड तालुक्याला ड्राय झोन मुक्त करण्यासाठी  अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन सिंचनाच्या सोई सुविधा उपलब्ध करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.  मोर्शी वरुड तालुक्यामध्ये सुरु असलेल्या जलसंधारण कामांमुळे आगामी काळामध्ये तालुक्यातील भूजल पातळीमध्ये वाढ होऊन टंचाई दुर होण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.


       आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकारामुळे शेती सिंचनासाठी वरदान ठरनाऱ्या कोल्हापुर पद्धतीचे नवीन बंधारे निर्माण करण्याकरिता पाठपुरावा करून ३ कोटी ७२ लक्ष १८ हजार  रुपयांचा निधी मंजूर करून दिला .  
    वरुड तालुक्यातील जरुड येथे मृद व जलसंधारण विभागा अंतर्गत जरुड येथे कैलासराव बिजवे यांच्या शेताजवळ शक्तीनदीवर कोल्हापुरी बंधाऱ्या करिता १ कोटी ४५ लक्ष ६७ हजार रुपये, जरुड येथील स्मशानभूमि जवळ शक्तीनदीवर कोल्हापुरी बंधाऱ्या करिता १ कोटी ४४ लक्ष ४६ हजार रुपये, ग्राम जरुड येथील बी.डी. कन्या शाळेजवळ शक्ती नदीवर साठवण बंधाऱ्या करिता ८२ लक्ष ५ हजार ३०० रुपये, या तिन्ही कामांकरिता ३ कोटी ७२ लक्ष १८ हजार रुपये मंजूर करून या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शिवाजी शिक्षन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री हर्षवर्धनजी देशमुख अध्यक्ष, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

     यावेळी शिवाजी शिक्षन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री हर्षवर्धनजी देशमुख अध्यक्ष, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, सरपंच सुधाकरराव मानकर, उपसरपंच शैलेश ठाकरे, अनिरुद्ध देशमुख, योगेश देशमुख, माजी सभापती राजा काका कुकडे,सोपान ढोले, मंगरुळी सरपंच राजेंद्रजी घोरमाडे, रोशन दारोकर,सुनिल हरले, गणेश देशमुख, उल्हास तडस, ज्ञानेश्वर यावले, जगदीश देशमुख, भीमरावजी हरले, प्रविण कोहळे, सुभाषराव खारोडे, पुष्पाताई बेले, सुजाताताई हरले, हर्षाताई पडोळे, जयश्रीताई पोटे, संजय ढोले, संजय घोरपडे, विष्णु राऊत, प्रशांत काळबेंडे, रविंद्र सुरजुसे, राजेश देशमुख, पिंटू ठाकरे, शुभम धर्मे,अक्षय बेले, अमित मानकर,विनायक टेकाडे,रुपराव पडोळे,नंदकिशोर कांबळे,शरद बावणे, नितीन धोटे, महेंद्र हरले यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती. 

Post a Comment

0 Comments