Ticker

6/recent/ticker-posts

युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव रोहित देशमुख यांचे अपघाती निधन, पाच जण गंभीर

 


टाकरखेडा संभु येथील रहिवासी, माजी खासदार के जी  देशमुख यांचे नातू होते,



टाकरखेडा संभू (वार्ताहार) संतोष शेंडे

भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभु येथील रहिवासी असलेले रोहित अजय देशमुख यांचे शनिवारी मध्यरात्री 12.30  वाजताच्या सुमारास अमरावती ते दर्यापूर मार्गावरील आराळा जवळ भीषण कार अपघातात निधन झाले, ते 27 वर्षाचे होते ,स्वातंत्र्यानंतर पहिल्या लोकसभेचे पहिले खासदार के,जी देशमुख यांचे ते नातू असून जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य जयंतराव देशमुख यांचे ते पुतणे आहेत, त्यांचे वडील अजय देशमुख हे टाकरखेडा संभु ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत ,त्यांचा राजकीय वारसा समोर नेत त्यांच्याकडे युवक काँग्रेसची महासचिव पदाची जबाबदारी होती ,

अकोला येथील युवक काँग्रेसचा कार्यक्रम अटोपून अमरावतीला परत येताना दर्यापूर जवळ त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली . शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झालेल्या या अपघातात यांचा रोहित जागेवरच मृत्यू तर झाला त्यांच्यासोबत असलेले पाच जण जखमी आहेत . पालक मंत्री यशोमती ठाकूर समर्थक यांचे मानले जाणाऱ्या  रोहित यांच्या अपघाती निधनाने जिल्हा काँग्रेसवर शोककळा पसरली आहे . रोहित देशमुख यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत . अमरावती - अकोला येथे - आयोजित युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटपून अमरावतीला परत येणाऱ्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला दर्यापूर जवळ आराळा येथे ट्रकने धडक दिली . शनिवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात युवक काँग्रेस अमरावती लोकसभा महासचिव रोहित अजय देशमुख ( 27) हे जागीच ठार झाले . या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे . 

रोहित देशमुख यांच्या पार्थिवावर आज ( रविवारी ) सायंकाळी  सायंकाळी ५ वाजता रुख्मिणी नगर येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे .


 पाच जण जखमी 

या अपघातात रोहित देशमुख यांच्यासोबत कारमध्ये असणारे युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, चांदुर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा मुलगा परीक्षीत जगताप ,युवक काँग्रेसचे  जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे आणि वाहनचालक व सनी नावाचा  युवक जखमी झाले आहेत त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments