Ticker

6/recent/ticker-posts

शासकीय योजनांचा लोक कलेच्या माध्यमातून जागर...!



बुलडाणा- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्हा ६३ ठिकाणी कलापथकाव्दारे शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. या उपक्रमाला जिल्ह्यात प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. या प्रचार कार्यासाठी निवड केलेल्या  निवड झालेल्या कलापथक संस्थांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनाची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहचविली. सोबतच लोकनाट्य, पथनाट्य व वासूदेव,  या पारंपारिक कलावंतांच्या भूमिकेतून ग्रामस्थांना मनोरंजक  पद्धतीने योजनाची माहिती करुन दिली. राजूर, शिरवा, कोथळी, आडविहिर, दुधा, म्हसला ग्रामस्थांचा कलापथक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मेहकर तालुक्यातील जानेफळ, वरवंड आदी गावामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

कलापथक संस्थांचे कलावंतांनी राज्य सरकारने दोन वर्षात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती नागरीकांचे मनोरंजन पद्धतीने  दिली. यामध्ये शिवभोजन योजना, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जलजीवन मिशन, आवास योजना, आरोग्यविषयक माहिती व स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यासह अन्य योजना व उपक्रमांचा समावेश होता.

  कार्यक्रमाला बुलडाणा तालुक्यातील म्हसला, दुधा येथील ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती होती. उपस्थित नागरिकांपैकी गजानन बिसन बावस्कर, जयरथ रामदास भोंडे या ग्रामस्थांनी  आपली प्रतिक्रिया देतांना सांगितले की,  या कलापथक कार्यक्रमातून विविध शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळाली.    म्हसला येथील  पोलिस पाटील रामेश्वर शिवाजी भोंडे, ग्रा. प सदस्य  संजय सखाराम बावस्कर आदींसह मोठ्या  संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments