Ticker

6/recent/ticker-posts

अव्वलस्थान गाठण्यासाठी 'तुमची' गरज | राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षक प्रदीप जाधव आघाडीवर | Teacher Of The Year

Teacher Of The Year

 

आपले मत नोंदविण्यासाठी वर क्लिक करा. 

मत कसे द्यायचे याविषयी माहिती खाली दिलेली आहे.


Teachmint द्वारा आयोजित Teacher Of The Year स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील वरखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रदीप जाधव यांनी आघाडी घेतली असून ते चौथ्या स्थानावर आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांनी (राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा असल्याने फेसबुक अकाऊंट असलेला कोणताही व्यक्ती मतदान करू शकतो.) त्यांना ऑनलाईन मतदान केल्यास या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ते अव्वल स्थान गाठू शकतात. 


प्रदीप जाधव हे यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल शिवणी पोड येथील शाळेत कार्यरत होते. तिथे त्यांनी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविल्याने राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले आहे. 

 

प्रदीप जाधव जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक. शासकीय शाळेतील शिक्षक म्हणजे केवळ पगारासाठी काम करणारा कर्मचारी हि व्याख्या मोडीत काढणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांपैकी एक. जिथे नियुक्ती होऊ नये म्हणून अनेक शिक्षक जीवाचा आटापिटा करतात, अशा दुर्गम भागातील आदिवासी पोडावरील शाळेचा चेहरामोहरा बदलणारे व अवघ्या काही काळातच राज्यातील दखलपात्र शाळांमध्ये गणना होईल अशी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडणारे धडपडे शिक्षक म्हणजे प्रदीप जाधव. त्यांच्या उपक्रमांची यादी मोठी आहे.

 

Pradip Jadhao Online Teachingलॉकडाउनच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रचंड हाल झाले. मोबाईल व इंटरनेट सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले नाही. मात्र प्रदीप जाधव स्वस्थ बसले नाहीत. ज्यांच्याकडे सुविधा आहे त्यांच्यासाठी नियमित ऑनलाईन क्लास व जे गरीब आहेत त्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. आजही त्यांचे 100 टक्के विद्यार्थी ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातून शिक्षण घेत आहेत. आपल्या कर्तव्याची जाण व विद्यार्थ्यांप्रती आपुलकी असेल तरच हे शक्य होऊ शकते.गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून शिक्षण घेता यावे. यासाठी त्यांची धडपड अजूनही सुरु आहे. Teachmint  च्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. नाविन्यपूर्ण व उपक्रमशील शिक्षकांची एक स्पर्धा Teachmint ने आयोजित केली आहे. 

 

यामध्ये प्रदीप जाधव देखील सहभागी आहेत. आपण काही सेकंदांचा वेळ काढून खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून त्यांना आपले अमूल्य मत दिल्यास त्यांचा उत्साह व प्रयत्न द्विगुणित होतील. तसेच इतरांनाही आपण मत देण्यास प्रवृत्त केल्यास या शैक्षणिक कार्यास आपला हातभार लागेल.मत नोंदवणे अगदी सोपे आहे..... 


1) http://wshe.es/a9iMIM7X या लिंकवर क्लिक करा.


2) त्यानंतर आपला ईमेल टाईप करून Vote टॅब वर क्लिक करा.


3) जर आपल्या ब्राऊजर मध्ये Pop Up ब्लॉक असतील तर Show Always करा.


4) त्यानंतर फेसबुक आयडी व पासवर्ड टाईप करा (हि लिंक पूर्णपणे सुरक्षित आहे). एका फेसबुक अकाऊंटवरून एकच मत देता यावे यासाठी फेसबुक लॉगिन करणे आवश्यक आहे. असे न केल्यास मत ग्राह्य धरल्या जाणार नाही. जर आपल्याला पासवर्ड आठवत नसेल तर पासवर्ड रिसेट करावा.


5) आता आपले मत मान्य झालेले असेल. एका व्यक्तीला एकदाच मत देता येईल.


6) मत नोंदविण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. त्यामुळे लगेच आपले मत नोंदवा.

 

7) शक्य असल्यास किमान 10 व्यक्तींना मत देण्यास प्रवृत्त करून त्यांना अडचण जात असल्यास आपण मदत करून ते करून घेतल्यास सोयीचे होईल. तसेच मित्रपरिवाराला देखील हि पोस्ट शेअर करावी.कोणत्याही कामात समाजाचा सहभाग अत्यंत गरजेचा असतो. विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळाले तर ते आणखी जोमाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी जातात. त्यामुळे या स्पर्धेत आपल्या भागातील एक शिक्षक अव्वलस्थानी यावा यासाठी आपल्या सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

 

आपल्या काही सेकंदाच्या वेळेने जर एखादी चांगली गोष्ट साध्य होत असेल तर प्रत्येकाने स्वतःलाच स्पर्धक समजून प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ स्वतःचे मत नोंदवून न थांबता थोडा आणखी वेळ काढून आपल्या घरचे सदस्य, मित्रमंडळी यांच्याकडूनही मत मिळाल्यास हे उद्दिष्ट सहज साध्य होईल. 

 

एक व्यक्ती किमान 10 मत एवढा सहभाग घेतल्यास बुलडाणा जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे नाव राष्ट्रीय पातळीवर गौरवान्वित होईल. ग्रामीण भागातही दर्जेदार, तंत्रज्ञानाची पुरेपूर जाण असणारे व ते विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरणारे शिक्षक आहेत हे देखील लक्षात येईल. 

 

मत दिल्यानंतर हि पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाइल तसेच विविध ग्रुपवर अवश्य शेअर करावी हि नम्र विनंती.

 

Post a Comment

0 Comments