Ticker

6/recent/ticker-posts

मतदार संघातील विविध विकासकामांसाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर !




मोर्शी -राज्य सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात मोर्शी विधानसभा मतदार संघावर निधीचा वर्षाव करण्यात आला आहे. मोर्शी वरुड तालुक्यात विविध योजनांसाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून त्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 
मोर्शी विधानसभा मतदारसंघात विविध रस्ते व आदिवासी मुला मुलिंचे वसतिगृह, मंडळ अधिकारी तलाठी कार्यालय,  व कर्मचारी निवासस्थानासाठी, शासकीय विश्रामगृह या सर्व विकसकामांकरिता शासनाने ५८ कोटी रुपयांची मंजुरी अर्थासंकल्पिय अधिवेशनात दिली असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.

आमदार देवेंद्र भुयार यांनी यांनी दोन वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मोर्शी मतदारसंघातील विकासकामांसाठी सर्वाधिक निधी खेचून आणला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आणुन रस्ते, पांदन रस्ते, धार्मिक स्थळे, सभागृह यासह आदीचा विकास केला आहे.
 अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी मतदार संघात विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती.आमदार देवेंद्र भुयार यांनी वेळोवेळी पाठपुरा केल्यामुळे यावेळी अधिवेशनात अर्थसंकल्पीय पुरवणी मागणीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये मोर्शी येथे शासकीय विश्रामगृह इमारतीचे बांधकाम करणे २ कोटी १६  लक्ष २० हजार रुपये. वरुड येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम करणे १ कोटी ७५ लक्ष ९२ हजार रुपये. मोर्शी येथे आदीवासी मुलांचे वसतिगृह बांधकामा करणे ८ कोटी ३५ लक्ष रुपये. वरुड येथे मुलींचे शासकीय वसतिगृह बांधकाम करणे १४ कोटी ९८ लक्ष रुपये. वरुड तालुक्यामध्ये ६ मंडळ अधिकारी ३४ तलाठी कार्यालय बांधकाम करणे ८ कोटी ७७ लक्ष रुपये. तसेच रस्ते विकासकामांसाठी तळणी, पिंपळखुटा, भांबोर, राजूरवाडी रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे ३ कोटी ५१ लक्ष रुपये. मोर्शी मालिमपूर तरोडा, धानोरा पोहचमार्गासह लहान पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ५० लक्ष रुपये. तिवसा घाट, शे.घाट, पुसला, गणेशपूर, मोवाड रामा/३१० रस्त्याची सुधारणा करणे करीता ६ कोटी रुपये. वरुड शे.घाट, रवाळा, नागठाना, रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी ८५ लक्ष रुपये. जरूड, इसंबरी, तिवासाघाट, शेघाट, सातनूर, उमरी रस्ता सुधारणा करणे २ कोटी ८५ लक्ष रुपये. धनोडी, शे.घाट, मलकापूर, वाई खुर्द, रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी ८५ लक्ष रुपये. 
जामगाव ते माणिकपूर रास्त तयार करणे १ कोटी ५० लक्ष रुपये. खडका,जामगाव, माणिकपूर, पळसोना, गव्हाणकुंड, भेमडी, झटामझिरी,रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ९५ लक्ष रुपये, या सर्व विकासकामांसाठी ५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली. आमदार देवेंद्र भुयार यांच्या कोट्यावधींच्या विकासकामांच्या धडाक्यामुळे मोर्शी विधानसभा मतदारसंघात नागरीकामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments