Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी अपघात विमा योजना



 अमरावती- शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा इतर घटनेमध्ये शेतकऱ्याची जीवितहानी झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या आधार दिला जातो. शासन अपघातग्रस्त  शेतकरी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी दिला. शासकीय विश्रामगृहात आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या 31 लाभार्थ्यांना श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या.

धामणगाव रेल्वे,चांदुर बाजार,अचलपूर,मोर्शी,दर्यापूर, भातकुली, वरुड तालुक्यातील 31 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 लक्ष रुपयांप्रमाणे 61 लक्ष रुपयांचे धनादेश स्वरूपात वाटप करण्यात आले. अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना धनादेश वितरित करण्यात आले. दीपाली तायवाडे, प्रतिभा कडू, दुर्गा पोहेकर, भाग्यश्री गणोरकर, सुरेश गोलहर, वनिता मेश्राम, सुमन मेश्राम, शंकर मेश्राम, शीला म्हस्के,मधुकर वाघ, बेबी कुयटे, पार्थ खंडारे, महादेव पेढेकर, अनिता बोकडे, वनिता टाक, अनिता खातदेव, जगदीश कडू, हरिभाऊ अडलक, अशोक निचत, विमल सोळंके, धनराज कंबळे, वंदना गुलहाने,मीना राऊत, सचिन कळसकर, राजेंद्र इखार, प्रेमीला गभणे, रंजना कबलकर, रंजीत गावंडे, सुमन शेंद्रे, माधुरी फरकुंडे व संगीता काठोले आदी उपस्थित होते.



राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेच्या 20 लाभार्थ्यांना श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेशचे वाटप

घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर त्यांच्या पत्नींसाठी राष्ट्रीय अर्थसहाय्य  योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अमरावती येथील 11 महिला लाभार्थ्यांना 2 लक्ष 20 हजार आणि भातकुली तालुक्यातील 9 लाभार्थी महिलांना 1 लक्ष 80 हजार रुपयांच्या धनादेशचे वाटप श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रति लाभार्थी 20 हजार रुपयांच्या धनादेश श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, भातकुलीचे उपविभागीय अधिकारी डॉ नितीन व्यवहारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, नायब तहसीलदार दिनेश बढिये, श्रीमती ठाकरे, केशव पळसकर, मंडळ अधिकारी विशाल धोटे व लाभार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments