Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्यांच्या बाजू भरण्याकरिता माती युक्त मुरुमाचा वापर, नागरिकांमध्ये रोष



 टाकरखेडा संभु (वार्ताहार)संतोष शेंडे

 रस्त्याच्या दोन्ही बाजू भरण्याकरिता मुरुम ऐवजी मातीमिश्रित साहित्य टाकल्या जात असल्याचा प्रकार रामा ते साऊर मार्गावर पहावयास मिळत आहे ,याबाबत नागरिकांनी रोष केला असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे ,

रस्ता बांधकामा नंतर रस्ता कायम टिकावा व तो मजबूत राहावा याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरूम टाकला जातो ,परंतु रामा ते  साऊर मार्गावर मात्र सदर कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला माती मिश्रित मुरूम आणून तो टाकल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे , त्या मुरुमाच्या गंज्या देखील रस्त्याच्या बाजूने पडलेले आहेत ,या मुरमा मध्ये 80 टक्क्यावर माती असल्याचे दिसत आहे ,याबाबत गावचे माजी सरपंच अभय बोंडे यांनी पाहणी केली असता हा सर्व प्रकार लक्षात आला ,त्यामुळे सदर रस्ता खराब होण्याची दाट शक्यता आहे, याची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदारावर कारवाई करून हा प्रकार थांबवावा व चांगल्या गुणवत्तेचा मुरूम रस्त्याच्या दोन्ही बाजूने टाकण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केल्या जात आहे.

रामा ते साऊर मार्गावर मी पाहणी केली असता मुरूम ऐवजी मातीमिश्रित मुरूम रस्त्याच्या बाजूला टाकलेला आढळून आला ,हा मुरूम नसून याला काय म्हणावे हेच मला कळत नाही, त्यामुळे याची चौकशी होऊन तात्काळ येथे चांगल्या गुणवत्तेचा मुरूम टाकण्यात यावा व संबंधितांवर कारवाई व्हावी,अभय बोंडे, माजी सरपंच साऊर.

Post a Comment

0 Comments