Ticker

6/recent/ticker-posts

आर्थिक शाश्वतेसाठी वनआधारित शेती आणि तत्सम उत्पादने काळसुसंगत :- डॉ. हर्षवर्धन देशमुख



 वन विद्या महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाद्वारे शेतकरी अभ्यास सहल संपन्न!


अकोला- वन आधारित उपजीविका उंचावणे तथा शेतकऱ्यानं मध्ये विविध सरकारी योजना बद्दल जन जागृती व्हावी या हेतूने, वनविद्या महाविद्यालयं डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला मार्फत शेतकऱ्यानं करीता दिनांक ५ मार्च २०२२ रोजी, नेचर्स ब्लिज ऑरगॅनिक फॉर्म, गाव मनभा, तालुका कारंजा येथे, मेडशी व माळराजुरा गावातील शेतकऱ्यानं साठी एक दिवसीय प्रशिक्षण व अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. एकूण ३० शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

या प्रशिक्षण कार्यक्रमास मेडशी तथा माळ राजुरा येथील ३० शेतकऱ्यांना विविध विषयाला धरून विविध विषयातील तज्ञांच्या मार्फत प्रशिक्षण दिले. सदर कार्यक्रम मध्ये नेचर ब्लीज चे श्री राहुल देशमुख यांनी प्रास्ताविक दिले तसेच, कृषि पर्यटन व एकात्मिक कृषि पद्धती यावर मार्गदर्शन केले तर

श्री निळकंठराव देशमुख यांनी शाश्वत भाजीपाला उत्पादन व  नियोजन यावर मार्गदर्शन केले.

तर श्री दत्तात्रय टाले यांनी मधूमक्षिका पालन या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, श्री पवन मिश्रा यांनी जैविकशेती व श्री निलेश हेडा यांनी मत्स्यपालन या विषयावर मा्गदर्शन केले. तर श्री श्याम सवाई यांनी खपली गहू या विषयावर मार्गदर्शन केले.

वनविद्या महाविद्यालय, अकोला च्या वतीने प्रा सुधाकर चौधरी यांनी वनशेती वर मार्गदर्शन केले तर प्रा  हर्षवर्धन देशमख यांनी कृषि वनशेती व धूर्यला धरून जैविक कुंपण यावर मार्गदर्शन केले व श्री अनंत देशमुख यांनी हिरडा झाडाचे महत्त्व सांगितले. तर शेतकऱ्यांकडून मेडशी मधील प्रगतशील शेतकरी श्री. अजिंक्य मेडशिकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा हर्षवर्धन देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाला वनविद्या महाविद्यालयाचे श्री गजानन तायडे, पृथ्वीराज चव्हाण व शाहबाझ कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता हातभार लावला.

कार्यक्रमाची सांगता, कारंजा स्थित श्री राहुल यांचे व्हाईट कोल या फॅक्टरी ला भेट दिली तेथे शेतकऱ्यांनी व्हाईट कोल उत्पादन संदर्भात माहिती घेतली.

Post a Comment

0 Comments