Ticker

6/recent/ticker-posts

रयत क्रांती संघटना शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्षपदी :-प्रा. युवराज लोखंडे यांची नियुक्ती

 


 रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते मा. आमदार श्री. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेल्या अनेक वर्षापासून रयत क्रांती संघटनेमध्ये सक्रियपणे काम करणारे व समाज हिताच्या अनेक बाबीसाठी स्वतःला झोकून देऊन सदैव काम करणारे प्रा.युवराज उत्तमराव लोखंडे यांची रयत क्रांती संघटना शिक्षक आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी निवड व्हावी याकरिता रयत क्रांती संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री.तुषार काचकुरे यांनी मा. श्री सदाभाऊ खोत यांच्यासह वरिष्ठाकडे शिफारस केली असता वरिष्ठांनी सदर शिफारस मंजूर करून प्रा.युवराज लोखंडे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार श्री तुषार काचकुरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन प्रा. युवराज उत्तमराव लोखंडे यांची रयत क्रांती संघटना शिक्षक आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यातआली आहे.सदर निवडीनंतर जिल्ह्यातील अनेक शिक्षकाकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे व शिक्षाकांमध्ये  आनंदाचे वातावरण आहे.

            सदर नियुक्ती करताना रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. तुषार काचकुरे यांनी प्रा. युवराज लोखंडे यांना भविष्यात शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावेत त्याचप्रमाणे समाजातील शेतकरी, शेतमजूर,नोकरदार, उद्योजक व व्यावसायिक तसेच समाजातील प्रत्येक घटकांच्या भल्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत व पदाचा वापर करावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments