Ticker

6/recent/ticker-posts

भारज ते शेगांव दिंडीचे शेलुद येथील किसनराव शिराळे पाटील यांच्या शेतात स्वागत

 


चिखली, मनोज जाधव - मागील तिन वर्षांपासून विदर्भ मराठवाडयाच्या सिमेवरील भारज येथून शेगांव निवासी संतश्रेष्ठं गजानन महाराज यांच्या पायी दिंडीचा शेलुद येथील किसनराव शिराळे पाटील यांच्या निवासस्थानी मुक्काम असतो. त्याअनुषंगाने यावर्षी १० मार्च रोजी दिंडीचे आगमन शेलुद या गावी झाले असता परंपरागत पध्दतीने शिराळे पाटील परिवार व गावकऱ्यांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले.

कोरोना काळामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये शासकिय नियम काटेकोरपणे पाळले जात असतांना शासन आदेशाने मोठया प्रमाणावर दिंडीच्या आयोजनावर देखील बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही दिंडीमध्ये खंड पडू नये या उद्देशाने कोरोना नियम पाळून निवडक भक्तांनी दिंडी अव्याहतपणे सुरु ठेवली होती. त्या सहभागी भक्तांची देखील *किसनराव शिराळे पाटील* व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख व्यवस्था केली होती. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे मोठया संख्येने भाविक भकत्ं दिंडीमध्ये सहभागी झाले होते.  गण गण गणात बोते , ज्ञानबा व तुकोबांच्या नामघोषाचा जयजयकार करीत शेगांव येथील गजानन महाराज चरणी लिन होण्यासाठी भाविक आतुर झालेले आहेत.



शेलुद या गावी मुक्कामी पोहचल्यावर शिवाजी किसनराव शिराळे यांच्याहस्ते महाराजांची सपत्नीक आरती करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्रं शिंगणे यांच्या वतीने कु गायत्रीताई शिंगणे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी शिवाजीराव शिराळे यांनी या पालखीचे स्वागत व सेवा करण्याचा मान मिळाला हि गजानन महाराजांची कृपा असल्याचे सांगून पालखीमधील भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकडे लक्ष दिले. यावेळी भारज येथुन दिंडीतील सहभागी असलेले नारायण पाटील , नाना बोडखे , संजय बोडखे , राजु पायघन, विष्णु तेलंग्रे, दशरथ दिलवाले , गजानन क्षिरसागर , बबन विधाते , रमेश पाटील यांनी पालखीचे अन्नदात्ते किसनराव शिराळे पाटील व शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांचा गजानन महाराजांची प्रतिमा , शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

पालखीच्या दर्शनासाठी जेष्ठं भाजपा नेते सुरेशआप्पा खबुकरे , अंकुशराव पडघान पाटील , ॲड ए. टी. देशमुख , प्रमोद पाटील , आ. श्वेताताई महाले यांचे स्वीय सहाय्यंक सुरेश इंगळे ,  सुनिल मोडेकर , मुरलीधर भालेकर, विलास राजपुत , आफताब खान ,प्रभाकर सपकाळ  विरेंद्रं वानखेडे , एस के मोरे , नरेशभाऊ शेळके , सुनिल सुरडकर , भगवान काळे ,  अमोल ढोरे , राम खेडेकर , दिपक म्हस्के , सुभाष देव्हडे , डॉ. शिंदे , डॉ. काळुसे ,  डॉ. सुशांत पाटील , डॉ महिंद्रे , अजय जवंजाळ , शंकर महाराज , राजेंद्रं तळेकर , देवानंद पटेल , संतोष लांडे , गजानन लांडे , सुनिल इंगळे , राजेंद्रं गायकवाड यांच्यासह माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर , राहुल बोंद्रे यांनी भेट दिली.

Post a Comment

0 Comments