Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. आ. केंद्र एकलारा येथे हिवताप व जलजन्य आजार जनजागृती मोहीम

 


एकलारा/मनोज जाधव - दि. 22 जून रोजी डॉ. भंडारी साहेब सहसंचालक हिवताप व हत्तीरोग अकोला तसेच मा. शिवराज चव्हाण साहेब जिल्हा हिवताप अधिकारी बुलडाणा, डॉ. मीनाक्षी काळे वैद्यकीय अधिकारी मा. होगे  साहेब  बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली एकलारा उपकेंद्र अंतर्गत गावांमध्ये  हिवताप व जलजन्य आजार जनजागृती अभियान राबविण्यात आले.

        प्रामुख्याने पावासाळ्यामध्ये डासांपासून पसरणारे आजार हिवताप, हत्तीरोग, चिकन गुनिया, व जापनीज एन्सेफेलायटीस(जेई) यांचा प्रसार वेगवेगळ्या डासामार्फत होत असतो. हिवताप जनजागृती कार्यक्रमामध्ये, कंटेनर सर्वेक्षण, डास आळी शोध मोहीम, ताप रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले व किटकजन्य आजार, हिवताप व डेग्यु बाबत हस्त पत्रिका वाटप करण्यात आल्या व आठवड्यतून एक दिवस 'कोरडा दिवस' पाळावा व आपल्या घराभोंवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, खड्डे बुजवावे, साचलेली गटारे वाहती करावी, परिसरात मडके, रांजन, कुलर व इतर पडीत भांड्यामध्ये पावसाचे पाणी साचू देऊ नये, टाक्यांना घट्ट झाकण लावावे असे आवाहन करण्यात आले तसेच शौच्छालयच्या व्हेंट पाईप ला जाळ्या बांधन्यात आल्या.डास उत्पत्ती स्थानांमध्ये गप्पे मासे सोडण्यात आले. श्रीमती विशाखा वाकोडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी अशा स्वयंसेविका यांना रक्त नमुने व इतर उपाययोजना बाबत प्रशिक्षण दिले. यावेळी श्री पी.एस. खराटे व श्री एस जी जायभाये आ. सहाय्यक, श्री घाडगे औषध निर्माता अधिकारी व श्री राहुल गवई आ. सेवक यांनी आरोग्य शिक्षण दिले आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी हे हजर होते.

Post a Comment

0 Comments