Ticker

6/recent/ticker-posts

प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबीत असलेल्या मागण्या तात्काळ निकाली काढा



मोर्शी तालुका प्रतिनिधी - हजारो प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्याय दुर व्हावा यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागणीची दखल घेऊन मोर्शी मतदार संघातील पुर्णत्वास आलेले सिंचन प्रकल्प तसेच विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती विदर्भ प्रदेश यांचे विविध मागण्यासाठी दिनांक ०४ मार्च, २०२२ पासुन जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे महाउपोषण चालु केले आहे. या सुरु असलेल्या उपोषणाचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन त्यांचेवर होत असलेला अन्याय दुर व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संबधित विभागाचे मा. मंत्री, मा.राज्यमंत्री महोदयांसोबत तात्काळ बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यावेळी केली. 

       आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागणीची दखल घेऊन मोर्शी मतदार संघातील पुर्णत्वास आलेले सिंचन प्रकल्प तसेच विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती विदर्भ प्रदेश यांच्या प्रमुख मागण्या सन २००६ ते सन २०१३ पर्यंत सरळ खरेदीने शेतकर-यांकडून खरेदी करण्यात आलेल्या जमीनी भुसंपादन कायदा २०१३ अन्वये करुन येत असलेल्या वाढीव मोबदला रकमेचा फरक तात्काळ अदा करावा. महाराष्ट्र पुर्नवसन कायद्यानुसार प्रकल्पामुळे विस्थापीत झालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे किंवा त्यांना व्यवसाय करण्यासाठी एक रकमी रुपये ५०.०० लक्ष देण्यात यावे. विस्थापीत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कायदा २०१३ नुसार देय असलेले सर्व लाभ देण्यात यावे.  विदर्भ विभागातील सर्व प्रकल्प ग्रस्तांच्या स्थानीक स्तरावर असलेल्या वेगवेगळ्या मागण्याचे निराकरण विनाविलंब होण्यासाठी रथानीरतरावर अधिकार देवुन तात्काळ समस्यांचे निराकरण करण्यात यावे. कलम ६४ अंतर्गत दाखल करावयाचे दावे तात्काळ निकाली निघण्यासाठी प्राधिकरण विभागीयस्तरावर करण्यात यावे. 

विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती विदर्भ प्रदेश यांचे मार्फत वरील मागण्यांसवधात दिनांक ०४ मार्च २०२२ पासुन चालु असलेल्या उपोषणा कत्यांचे मागणीचा विचार करुन आपले सोईनुसार संबधित खात्याचे मा.मंत्री, मा.राज्यमंत्री य आवश्यक सर्व शासकीय यंत्रणेसह बैठक आयोजित करण्यात यावी. सदर बैठकीस उपोषण कर्त्यांचे प्रमुख मनोज चव्हाण, मानीकराव गंगावणे, साहेबराव विधळे यांना निमंत्रीत करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

Post a Comment

0 Comments