Ticker

6/recent/ticker-posts

विकासकामांचे पूर्ततेसाठी पर्याप्त निधी उपलब्ध करण्यावर सदैव तत्पर

MLA sulbha khodake


अमरावती-  विलास नगर समीप रामपुरी कॅम्प परिसर स्थित सहकार नगर ते कृष्णा नगर , लुल्ला लाईन , कृष्णा नगर गल्ली क्रमांक ५ , येथे  रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मूलभूत सोयी सुविधा विशेष अनुदान अंतर्गत रस्ते बांधकाम या विकास कामांचे   आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. रुपये - ८२.८५ लक्ष निधी अंतर्गत होणाऱ्या या रस्ते बांधकाम सुविधेमुळे स्थानिक नागरिकांना आवागमन करण्यासाठी आता नवसुविधा निर्माण झाली आहे. तदपूर्वी मनीष बजाज व सहकारी बांधवांचे वतीने याबाबत निवेदन सादर करण्यासह आमदार महोदय यांचे लक्ष वेधून त्यांना अवगत सुद्दा करण्यात आले होते. या मागणीची तात्काळ दखल घेऊन आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी रुपये - ८२.८५ लक्ष निधी उपलब्ध करीत स्थानिक नागरिकांची बहुप्रतिक्षित मागणीची पुर्तता केली आहे.याबद्दल आमदार महोदय यांचा नागरिकांचे वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कुदळ मारीत व विकासकामांचे नामफलकाचे अनावरण करण्यासह आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी भूमीपूजनाची औपचारिकता साधली. शहरी भागात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पर्याप्त निधी उपलब्ध करून देण्यावर आपला भर आहे. रस्ते बांधकाम, सौंदर्यीकरण, नियमितपणे जलापूर्ती , पायाभूत सुविधांची निर्मिती, अखंड वीजपुरवठा ,आदींसह अन्य नागरीसुविधा उपलब्ध करण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे.

 जनसामान्यांना अपेक्षित विकास कार्यक्रम राबविण्यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देत जनतेचे ऋण फेडण्याचा हा आपला एक अल्पसा प्रयास आहे. या शब्दात आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यादरम्यान प्राप्त निवेदनांचा स्वीकार करीत स्थानिक परिसरात पाहणी करून समस्या जाणून घेतांना आमदार महोदयांनी आगामी काळात या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजनांची निश्चित अंमलबजावणी केली जाईल. असा विश्वास सुद्धा व्यक्त केला.जनभावणेचा आदर करीत रुपये-८२.८५ लक्ष निधी उपलब्ध करीत वचनपूर्तता केल्याबद्दल तथा रस्ते सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करीत सहकार नगर , कृष्णा नगर, रामपुरी कॅम्प वासीयांचे वतीने त्यांचे आभार मानले. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडकेसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय समनवयक- संजय खोडके , विद्यादेवी बजाज , माजी नगरसेवक - भूषण बनसोड , मनीष बजाज, मोहनलाल आहुजा , डॉ. आय. टी. गेमनानी , राजकुमार दुर्गाई ,गोवर्धन धामेचा , प्रकाश पोपटांनी , हरीश दलवाणी ,मनोहर कटियार, यश खोडके, माजी नगरसेवक - भूषण बनसोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता- सुनील जाधव ,पंकज थोरात ,रामचंद्र देवगडे, श्रीजीत दिवाण,विर्भाण मोटवानी, सुरेश जयसिंघणी, ठाकुरदास हासानी, मोहित बजाज, गुलाब उदासी , सुनील उदासी , रामचांद छूटलानी , गणेश थावरणी , शंकर ओटवणी , शमनलाल चिमनानी, गुलाब धामेचा , हरीश उधवानी , नौतनदास खिलराणी , मोहीत भोजवाणी , भागवानदास मिराणी , महेश बजाज , बालकीसन बसंतवानी , कोमलदीदी आहुजा , चंदिराम थावरणी , प्रशांत पेठे , घनश्याम दास उधवानी , ज्ञान धामेचा , प्रदीप खंडारे , तुलसी बजाज , मनिष उधवानी , प्रवीण भोरे , केशव वानखडे , रवी भोजवाणी , राजकुमार भोजवाणी , जितेंद्र भोजवाणी , आनंद जेठाणी , रामचंद्र संभावणी , सचआनंद मंगलांनी , धनराज साधवानी , माजी नगरसेवक - हरीश जगमलानी, राजू आयलानी , शाम आहुजा , सचिन मावदे , राहुल खेमानी , विकी छबळणी ,  राकेश जयसिंघणी , लालचंद धामेचा , सुरेश देवांनी , कमलकुमार पंजवानी , हरीश पुरसवणी , राम छूटलानी , अजय नावानी , आनंद  देवांनी , गोविंद चावला , संदिप साधवानी , दीपक आहुजा , वैभव बजाज , मयुर मोटवानी , जितेंद्र उदासी , जयपाल साधवानी , किशोर सिरवणी , राजकुमार आयलानी , जियलदास सिरावणी , अशोककुमार नावानी , जॉनी जयसिंघणी , सुनिल सिरावणी , प्रताप सोमनांनी , वासुदेव ख्रिसवणी , नरेंद्र सिरवणी ,  आदींसह जेष्ठ नागरिक , महिला भगिनी सह युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments