Ticker

6/recent/ticker-posts

गुणवत्ता म्हणजे परीक्षेतील मार्कांची गोळाबेरीज नसते- ठाणेदार राहूल गोंधे

 


जानेफळ- स्थानिक  येथील श्री सरस्वती विद्यालयात वर्ग 9च्यावतीने वर्ग 10वीला निरोप देण्यात आला. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डी आर माळी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहूल गोंधे हे होते. प्रमुख मार्गदर्शक हास्यकवी कृष्णा हावरे व प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य अशोक खोरखेडे पर्यवेक्षक शिवराम बावस्कर हे होते.

सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कलशिक्षक भारत अवचार यांनी सुस्वर स्वागतगीत गायले. अतिथीच्या सत्कारानंतर शिक्षक गजानन पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले.



विध्यार्थी मनोगतात कु. मानसी मिटकरीने सादर केलेल्या शिक्षकांवर आधारित स्वरीचत कवितेला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर शुभम सरदारने आपले मनोगत व्यक्त केले.

प्रमुख अतिथी ठाणेदार राहुल गोंधे यांनी मला ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत प्रमुख अतिथी होता आले नसले तरी सरस्वती विद्यालयासारख्या नामांकित शाळेत प्रमुख अतिथी होता आले याचा खूप आनंद वाटतो असे म्हणून ते खूप भावनिक झाले. आपल्या अश्रूना त्यांनी वाट मोकळी करून दिली. गुणवत्ता म्हणजे परीक्षेत मिळालेल्या मार्कांची गोळबेरीज नसते. आपण आपले ध्येय ठरवा आणि झोकून दया, यश तुमच्या पायाशी लोळण घेईल असे मत त्यांनी मांडले. तर प्रमुख मार्गदर्शक हास्यकवी कृष्णा हावरे यांनी जीवनाच्या वास्तवावर बोट ठेवत अनेक उदाहरण देत मुलांना हसवून हसवून लोटपोट केले. त्यांनी सादर केलेल्या कविता मुलांना हसवून गेल्या. त्यांनतर उपप्रचार्य खोरखेडे, पर्यवेक्षक प्रा. बावस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य माळी यांनी अनेक प्रेरणादायी उदाहरणे देत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीनल जोहरे तर आभार प्रदर्शन किशोर पेटकर यांनी केले. त्यानंतर सर्व मुलांना फराळ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण खरात, मोरे, विनोद बाहेकर, नामदेव राठोड, संतोष जाधव, मदन अंभोरे, प्रतिभा शिंदे, श्रीमती तळेकर, संतोष मुरडकर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments