Ticker

6/recent/ticker-posts

होळीचा फगवा नं देणे जीवाला बेतले, युवकांची हत्या आरोपी अटकेत

 


परतवाडा /अशोक वस्तानी- अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पो स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुंभी वाघोली येथील 26वर्षीय रमेश नक्कलसिंग ने आदिवासीनी मागितलेला फगवा नं दिल्याने जीव गमवावा लागला रमेश चे मारेकरी तिन्ही आरोपीना अटक.

मिळालेल्या माहिती नुसार रमेश हा डाँ गोडे चे शेतात सोकारी म्हणून कामावर होता आज रमेश कुंभी वाघोली तें गोंडवा मार्गे जात असताना होळीचे आदिवासी परंपरे नुसार करोपीनी रमेशला रस्त्यात अद्विले व फगवा मागितला रमेशने फगवा (पैसे )देण्यास नकार दिला तेव्हा त्याचे डोक्यावर आरोपी आरती सीमा खडाये ने मोठा दगड फेकून मारल्याने रमेश बाईक वरून काळी पडला व जखमी झाला पोलिसांनी त्याला पथ्रोट चे रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारासाठी नंतर रमेशला अचलपूरला पाठविण्यात आले परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला पथ्रोटपोलिसांनी 302नुसार गुन्हा दाखल करून आरोपी अंकल हिरालाल खडाये, आरती सीमा खडाये व गणेश हिरालाल खडाये ला अटक केली

उल्लेखनीय बाबा म्हणजे होली उत्सवाच्या दरम्यान आदिवासी क्षेत्रतून जाणाऱ्या येणाऱ्याचे वाहने अडवून फगवा मागण्याची आदिवासीची परंपरा आहे त्र आदिवासी प्रत्येक दुकानात जाऊनही फगवा मागतातप रंतु रमेशला फगवा देण्यास नाकारणे महागात पडलेपु ढील तपास पो. नि. सचिन जाधव करीत आहेत.

Post a Comment

0 Comments